Viral Video: आधी नवऱ्याशी वाद मग धावत्या ट्रेनमधून उडी; घटनेचा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण
Women Viral Video: प्रत्येक नात्यात वाद होणे अतिशय सामान्य गोष्ट आहे, मात्र अनेकदा हे वाद वेगळे रुप धारण करत मोठी घटना घडते. देशभरात अशा अनेक घटना घडल्यानंतर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत असतात, त्यातच सध्या या घडनेला नगडित एका भयंकर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ट्रेनमध्ये वाद झाल्यानंतर धावत्या ट्रेनमधून उडी मारली आहे.
व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक ट्रेन दिसत आहे. ट्रेनच्या या कंपार्टमेंटमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र याच कंपार्टमेंटमध्ये एका जोडप्याचे वाद सुरु असतात. मात्र काही वेळात सामान्य वाटणारे हे वाद भयानक रुप घेतात. अर्थात व्हिडिओत वाद घालत असलेली महिला ट्रेनच्या दारात उभी असते. वाद सुरु असताना महिला दरवाजातून हळू-हळू खाली उतरते मात्र याची कल्पना कोणाला नसते की ती महिला काही वेळात धावत्या ट्रेनच्या दारातून उडी मारते. महिलेने उडी मारताच संपूर्ण कंपार्टमेंटमध्ये असलेले प्रवाशी हैराण झालेले दिसत आहे. एका व्यक्तीने फक्त त्यांचे वाद कॅमेऱ्याक कैद करत असतो मात्र सर्व घटना कैद होते.
घडलेली घटना कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही, मात्र 'हिंदुस्थान नाव' नुसार सर्व घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''mohmmad.hasiv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ६ डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. मात्र सध्या या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
धक्कादायक घटनेवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''हे खूप भयानक होते''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''ती किती असहाय्य झाली असेल'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''अशा महिलांना वाचवून काही फायदा नाही, ते तुम्हाला सोबत घेऊन बुडतील कारण ते समोर आणि मागे काहीही विचार करत नाहीत'', तर सर्व प्रतिक्रिया पाहता काहींनी संतापजणक तर काहींनी हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.