Chinese Factory: चायनीज पकोडा बनवताना शर्ट अडकला; २३ सेकंदात मशीनने मजुराचा घात केला; थरकाप उडवणारा Video Viral

Mumbai Shocking News : दादरमध्ये मशीनमध्ये एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेने दादर प्रभादेवी परिसरात खळबळ उडाली होती. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Chinese Factory Man Died
Mumbai Shocking News Saam Tv
Published On

सचिन गाड, साम प्रतिनिधी

एका दुकानात चायनीज पकोडा बनवणाऱ्या मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबईतील दादरमध्ये ही दुर्दैवी घटना घडलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अंगाचा थरकाप उडवणारा आहे. तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सावधान! या व्हिडिओतील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.

मुंबईतील दादर वरळीमध्ये शनिवारी रात्री चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये अडकून एका मजुराचा मृत्यू झाला होता. मशीमध्ये अडकल्याने मजुराचा जागीच मृत्यू झाला. शरीराचा अर्धा भाग या मशीनमध्ये अडकल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आल्यानंतर कारखान्यात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केलाय. निष्काळजीपणा मृत्यूसासाठी कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दादरमध्ये एका मशीनमध्ये अडकून एका मजुराचा मृत्यू झाला होता. या मृत मजुराचं वय १९ वर्ष असल्याचं सांगितलं जात असून सूरज यादव असे त्याचे नाव आहे.

दादरमधील प्रभादेवीच्या नरीमन भाटनगर भागातील एका दुकानात ही दुर्घटना घडली. चायनीज पकोडा बनवताना या मजुराचा हात अडकला आणि तो पूर्णपणे त्यामध्ये ओढला गेला.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात की, एक मजुर चायनीज पकोडा बनवण्यासाठी तयारी करत आहे. ग्राइंडरमध्ये पकोडे तयार करण्यात येत होते. तर एक व्यक्ती त्या मशीनमध्ये हात टाकून ग्राइंडरच्या पात्याला अडकलेलं पीठ बाजुला करत आहे.

त्याच्या कामाची हीच कसब त्याला मृत्यूच्या दाढेत घेऊन गेली. पात्याला लागलेलं पीठ बाजुला करताना त्याचा शर्ट त्या पात्यात अडकला आणि हा मजुर त्या मशीनमध्ये ओढला गेला. त्याच अर्ध शरीर त्या मशीनमध्ये अडकलं, त्याच्या शरीराचे दोन भाग झाल्याचं सांगितलं जात आहे. चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकल्याने कर्मचारी आतमध्ये ओढला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com