Kalyan Crime: रस्ता विचारण्यावरून वाद, तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan News: कल्याणध्ये पूर्वमध्ये एका तरुणाने रस्ता पुढे सुरु आहे का? असे विचारल्याने संतापलेल्या मद्यधुंद तरुणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला.
Kalyan Crime: रस्ता विचारण्यावरून वाद, तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना
Kalyan Crime News Saam Tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याणमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ल्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रस्ता विचारला म्हणून वाद घालत मद्यधुंद तरुणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. कल्याण पूर्वेला ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. फरार झालेल्या २ तरुणांचा शोध सुरू आहे.

कल्याणध्ये पूर्वमध्ये एका तरुणाने रस्ता पुढे सुरु आहे का? असे विचारल्याने संतापलेल्या मद्यधुंद तरुणांनी या तरुणाशी आणि त्याच्या मित्रांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मद्यधुंद तरुनांनी रस्ता विचारणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. धीरज जावळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Kalyan Crime: रस्ता विचारण्यावरून वाद, तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना
Hingoli Crime News : सख्खा भाऊ पक्का वैरी; आधी केली भावाची हत्या, अंत्यसंस्कार करत दिली हरविल्याची तक्रार

या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोर गणेश शेवाळे नावाच्या तरुणाला अटक केली आहे. पसार झालेल्या अक्षय गोगावले आणि विकी महानरवर या दोन तरुणांचा पोलिस शोध घेत आहे. निवडणुका संपताच पुन्हा एकदा कल्याण पूर्वेतील गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे .

Kalyan Crime: रस्ता विचारण्यावरून वाद, तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना
Cyber Crime : शेअर खरेदीच्या नावाने ऑनलाइन गंडा; व्यापाऱ्याची ३४ लाखांत फसवणूक

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात राहणारे धीरज जावळे त्याचा मित्र तेजस बराडे याच्यासोबत दुचाकीवरुन विजयनगर परिसरातून जात होता. एका ठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरु होते. या दोघांनी समोर येणाऱ्या एका दुचाकी चालकास रस्ता पुढे सुरु आहे का ? असे विचारले . धीरजने हे विचारताच समोरच्या एका तरुणाने धीरजला शिवीगाळ केली. शिवी देणाऱ्या तरुणासोबत दुचाकीवर दोन जण होते. त्यावर धीरजने शिवीगाळ का करताय असे विचारलं .

Kalyan Crime: रस्ता विचारण्यावरून वाद, तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना
Baramati Crime : तिप्पट रक्कम परतावा देण्याचे आमिष; सव्वा आठ लाखांची फसवणूक, बारामतीत दोघांवर गुन्हा

आरोपींनी धीरज आणि त्याचा मित्र तेजसला मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने त्याच्या जवळचा धारदार कोयता काढून धीरजच्या डोक्यात वार केला. या घटनेत धीरज गंभीर जखमी झाला. हल्ला करणाऱ्यांपैकी २ जण पसार झाले. तर नागरिकांना एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरजवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोलशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी गणेश शेवाळे याला अटक करत अन्य दोन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Kalyan Crime: रस्ता विचारण्यावरून वाद, तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना
Crime News : बापरे! समृद्धी महामार्गावर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com