Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर बुलडोजर चालणार? हजारो नागरिक बेघर होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Kalyan Dombivli update : तुम्ही घर घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे...कारण, रेराची नोंदणी असूनही कल्याण-डोंबिवलीत हजारो रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आलीय. कारण या सर्व इमारतींवर हातोडा पडणार आहे.. नेमकं असं काय घडलं कल्याण-डोंबिवलीतल्या रहिवाश्यांसोबत...पाहुयात हा रिपोर्ट...
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर बुलडोजर चालणार? हजारो नागरिक बेघर होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Kalyan Dombivli Newsrepresentative photo
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिका आणि रेराची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने इमारती पाडण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले आहे. त्यामुळे तब्बल साडेसहा हजार कुटुंबांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार आहे....मात्र बिल्डर आणि प्रशासनाच्या चुकीची आम्हाला शिक्षा का? असा सवाल रहिवाशांनी केलाय..

कल्याण आणि डोंबवली महापालिका हद्दीत रेराची परवानगी घेऊन तब्बल 65 बेकायदा इमारती बांधण्यात आल्या. त्यावरून उच्च न्यायालयाने महापालिका अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. मात्र त्यानंतर आता उच्च न्यायालयाने कठोर निर्णय घेत 65 इमारती पाडण्याचे आदेश दिलेत...मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे?

कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर बुलडोजर चालणार? हजारो नागरिक बेघर होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Kalyan Crime: सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, कल्याणमध्ये खळबळ; घटना CCTV मध्ये कैद

65 इमारतींवर बुलडोजर चालणार?

5 वर्षात कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत 65 इमारतींची उभारणी

बिल्डरने महापालिकेच्या बोगस पत्राच्या आधारे रेराचं प्रमाणपत्र मिळवलं

बिल्डिंगच्या उभारणीनंतर ग्राहकांना घरांची विक्री

2022 मध्ये संदीप पाटील यांच्याकडून घोटाळा उघड

संदीप पाटील यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका

मानपाडा आणि डोंबिवली पोलिसांत विकासकावर गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाकडून इमारती तोडण्याचे आदेश

कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर बुलडोजर चालणार? हजारो नागरिक बेघर होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Kalyan News : चोरट्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दगडफेक; आंबिवलीच्या इराणी वस्तीतील घटना, एक पोलीस जखमी 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 65 इमारती पाडायला हव्यात... मात्र बिल्डर, रेरा आणि महापालिकेने कुटुंबांना भरपाई देण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या संदीप पाटील यांनी केलीय..

अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 65 इमारतींवर कारवाई होणारच, असं मत महापालिकेकडून व्यक्त करण्यात आलंय. सर्वसामान्य लोकं आयुष्याची जमापुंजी खर्चून घर घेतात.. मात्र बिल्डर, रेरा आणि महापालिकेच्या साटेलोट्यामुळे सर्वसामान्यांच्या घरावर हातोडा चालतो.. त्यामुळे न्यायालयाने आदेश दिला असला तरी महापालिका आणि रेरा रहिवाशांना दिलासा देणार का? याकडे लक्ष लागलंय.

कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर बुलडोजर चालणार? हजारो नागरिक बेघर होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Kalyan News : कल्याण डीसीपी स्कॉडची मोठी कारवाई; सात लाखांचा गुटखा जप्त, एकाला घेतले ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com