Kalyan News : कल्याण डीसीपी स्कॉडची मोठी कारवाई; सात लाखांचा गुटखा जप्त, एकाला घेतले ताब्यात

Kalyan News : तिघा गुटखा माफियापैकी जहांगीर शेख याला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघेजण फरार झाले आहेत.
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणच्या भानू सागर परिसरात गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण डीसीपी स्कॉडने एका गोडावूनवर छापा टाकत गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणाहून तब्बल ६ लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. 

कल्याणच्या पश्चिमेतील भानू सागर परिसरात असलेल्या गुटखा गोडावून बाबत डीपीसी स्कॉड आणि कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मिळून एका गोडावूनवर छापा टाकला. या छापेमारीत गोदामात जवळपास सात लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांची हि मोठी कारवाई मानली जात आहे. 

Kalyan News
Sangli Crime : मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल कामगाराचा खून; सांगलीतील धक्कादायक घटना, दोघे हल्लेखोर ताब्यात

दरम्यान पोलिसांनी छापेमारी करत तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून या कारवाईनंतर गुटखा माफिया जहांगीर शेख, जिशान खान आणि मुनावर खान या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघा गुटखा माफियापैकी जहांगीर शेख याला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघेजण फरार झाले आहेत. 

Kalyan News
Nashik News : नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या; मनसे आक्रमक, कारवाईबाबत पोलीस प्रशासनाला दिले निवेदन

यातील मुनावर खान हा या रॅकेटचा म्होरक्या असून सदरचा गुटखा कल्याण स्टेशन परिसरातील टपऱ्यावर पुरविला जात असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. तर दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी हा गुटख्याचा धंदा सुरु आहे. मात्र डीसीपी कार्यलयात राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com