रेल्वे स्थानकावर गर्दीतील धक्क्यामुळे प्रवाशांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी|VIDEO

Railway Police Stop Altercation At Badlapur Station: बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळच्या गर्दीत दोन प्रवाशांमध्ये धक्क्यामुळे हाणामारी झाली. रेल्वे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून वाद शांत केला.

बदलापूर: गर्दीत धक्का लागल्याच्या वादातून बदलापूर रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांची हाणामारी झाल्याची घटना घडलीय. बदलापूर स्थानकातून सीएसटीएमकडे जाणारी 7.33 ची लोकल स्थानकात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी गर्दीमुळे प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्या रागातून दोघांमध्ये प्लॅटफॉर्म नंबर तीन वरच हाणामारी सुरू झाली. दरम्यान प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी दोन्ही प्रवाशांना शांत करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढचा अनर्थ टाळला. बदलापूर स्थानकात दररोज सकाळच्या सुमारास लोकल ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे अनेकदा क्षुल्लक कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com