Ahemdabad Plane Crash
अहमदाबादमध्ये एक लघुविमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, टेकऑफदरम्यान यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विमान कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विमान कोसळल्याचा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.