Boeing 737: विमान लँडिंग गियरमध्ये लागली आग; १७९ जणांचा जीव टांगणीला लागला अन्...; पाहा थरारक व्हिडिओ

Emergency Evacuation American Airlines: डेन्व्हरहून मियामीकडे जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट AA3023 मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. डेन्व्हरहून मियामीकडे जाणाऱ्या बोईंग 737 मॅक्स या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना विमानतळावर उतरत असताना घडली असून, तांत्रिक बिघाडामुळे टायर फुटल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या विमानात १७३ प्रवासी आणि ६ चालक दलाचे सदस्य होते. सुदैवाने, तातडीने कारवाई करत सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा दाखल झाल्या असून, या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विमान वाहतूक व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अमेरिकन एअरलाइन्सने या संदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com