Air Plane Crash: उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाच्या इंजिनला आग; पाहा थरारक VIDEO

Engine Fire Forces Boeing: लॉस एंजेलिस विमानतळावरून अटलांटासाठी उड्डाण केलेल्या बोईंग ७७७ विमानाच्या इंजिनला आगीचा भडका; वैमानिकांच्या सतर्कतेने विमानाचं यशस्वी आपत्कालीन लँडिंग. प्रवासी सुखरूप, तपासासाठी बोईंगकडून चौकशीचे आदेश.

अमेरिका येथील लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटलांटाकडे उड्डाण करणाऱ्या बोईंग ट्रिपल सेव्हन (Boeing 777) विमानाच्या इंजिनला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनातून धूर व ज्वाला निघताना दिसल्या. यानंतर वैमानिकांनी तत्काळ सतर्कतेने निर्णय घेत एलएएक्स (LAX) विमानतळावर परतीचा मार्ग धरला आणि आपत्कालीन लँडिंग केले.

विमानात नेमके किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या विमानाद्वारे त्यांच्या पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, बोईंग कंपनीकडून या तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com