Ahmedabad Airplane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत कॅप्टनचीच चूक, अमेरिकन रिपोर्टमध्ये मोठा दावा; काय घडलं?

Air India Plane Crash: अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये अहमदाबाद विमान दुर्घटनेशी संबंधित अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात एअर इंडिया विमानाच्या कॅप्टननेच इंजिनचे फ्यूल बंद केले होते असा दावा करण्यात आला आहे.
Ahmedabad Airplane Crash
Ahmedabad Airplane Crashx
Published On

Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघाताविषयी नवी माहिती समोर आली आहे. एअर इंडिया विमानातील कॅप्टनने विमानाच्या इंजिनचे फ्यूल बंद केले होते, असे दोन्ही वैमानिकांमधील शेवटच्या संभाषणाच्या कॉकपिट रेकॉर्डिंगवरुन दिसून आले आहे, असा दावा अमेरिकन मीडिया वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, बोईंग ७८७ ड्रीमलाइनर उडवणाऱ्या फर्स्ट ऑफिसरने अनुभवी कॅप्टनला 'तुम्ही रनवेवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच स्विच कटऑफ स्थितीत का ठेवला', असे विचारले होते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये फर्स्ट ऑफिसर घाबरुन गेला होता, तर त्याच्या सोबतचे विमानाचे कॅप्टन शांत होते, असा उल्लेख करण्यात आला आहे.

Ahmedabad Airplane Crash
Maharashtra Politics : सोन्याचा चमचा अन् भरलेलं ताट, विधान परिषदेत एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली

अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिर क्लाईव्ह कुंदर यांचा जीव गेला. सुमित सभरवाल यांना १५,६३८ तास, तर क्लाईव्ह कुंदर यांना ३,४०३ तास फ्लाईट उड्डाणाचा अनुभव होता. वॉल स्ट्रीट जर्नलने एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AIIB) च्या प्राथमिक अहवालाचा हवाला दिला आहे. या अहवालात टेकऑफनंतर दोन्ही इंजिनांचे फ्यूल कटऑफ स्विच काही क्षणातच कटऑफ स्थितीत पोहोचले होते. उड्डाण आणि अपघात यादरम्यानचा कालावधी फक्त ३२ सेकंदांचा होता.

Ahmedabad Airplane Crash
Pune : पुण्याच्या ससून रुग्णालयात राडा! काचा फोडल्या, मशिन्सची तोडफोड अन् सुरक्षारक्षकाला मारहाण

वॉल स्ट्रीट जर्नलने या प्रकरणात तज्ज्ञ, अमेरिकन वैमानिक आणि तपासावर लक्ष ठेवणाऱ्या सुरक्षा तज्ज्ञांचा हवाला देला. प्राथमिक अहवालात दिलेल्या तपशीलांवरून विमानाच्या कॅप्टनने स्वत: स्विच बंद केले होते असे दिसून येते. स्विच बंद करणे अपघाती होते की जाणूनबुजून होते हे अहवालात नमूद केलेले नाही.

Ahmedabad Airplane Crash
Maharashtra Politics : शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र! महापालिकेसाठी शिंदेंचा नवा प्रयोग? रिपब्लिकन मतं शिंदेंना तारणार?

नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हा अहवाल केवळ प्राथमिक निष्कर्षांवर आधारित आहे. तेव्हा अंतिम अहवाल प्रसिद्ध होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नये, असे किंजरापु राम मोहन नायडू यांनी म्हटले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या या अहवालावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Ahmedabad Airplane Crash
Maharashtra Politics : फडणवीसांची ठाकरेंना ऑफर, शिंदेंना शह देण्यासाठी फडणवीसांची खेळी? ठाकरे ऑफर स्वीकारणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com