Maharashtra Politics : शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र! महापालिकेसाठी शिंदेंचा नवा प्रयोग? रिपब्लिकन मतं शिंदेंना तारणार?

Maharashtra : ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिंदेंनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा दिलाय... मात्र आतापर्यंत हा प्रयोग किती वेळा झालाय? आणि या युतीचा शिंदेंना किती फायदा होऊ शकतो? पाहूयात....
Eknath shinde Anandraj ambedkar
Eknath shinde Anandraj ambedkarX
Published On

Maharashtra Political News : ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवा डाव टाकलाय... शिंदेंनी मुंबई महापालिकेतील दलित मतं आपल्याकडे वळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती करुन शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा दिलाय... तर आंबेडकरी जनतेसाठी सत्तेत वाट्याची मागणी आनंदराज आंबेडकरांनी केलीय... तर शिंदेंनी थेट बाळासाहेब आंबेडकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत युतीच्या केमिस्ट्रीवर भाष्य केलंय...

खरं तर शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीला मोठा इतिहास आहे... 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर अवघ्या 6 वर्षांनी पहिल्यांदा शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकीचा नारा दिला...

1972

बाळासाहेब ठाकरेंची रिपब्लिकन गवई गटासोबत युती

1976

बाळासाहेब ठाकरेंची दलित पँथरसोबत युती

2011

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवलेंसोबत शिवसेनेने युती केली

2023

शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गट आणि कवाडे गट एकत्र

2023

शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकरांची युती

Eknath shinde Anandraj ambedkar
Maharashtra Politics : सोन्याचा चमचा अन् भरलेलं ताट, विधान परिषदेत एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असल्यापासून अनेकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकीचा प्रयोग करण्यात आला..त्यात आता एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या युतीचा समावेश आहे... खरंतर आनंदराज आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत 18 हजार मतच मिळाली होती.. मात्र शिंदेंची आनंदराज आंबेडकरांसोबतची युती ही आंबेडकरी मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे...

Eknath shinde Anandraj ambedkar
Pune : पुण्याच्या ससून रुग्णालयात राडा! काचा फोडल्या, मशिन्सची तोडफोड अन् सुरक्षारक्षकाला मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com