
Maharashtra Political News : अंबादास दानवे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला. त्यांना निरोप देण्यासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर लगेच उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.
'एक कार्यकर्ता म्हणून अंबादास दानवे आपण उकृष्ट काम केले आहे. सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला, गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात तुमचा जन्म झाला असला; तरीसुद्धा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या जीवनात बदल व्हावा यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना, विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना आपण जे प्रयत्न केलेत, ते सर्वांना माहीत आहेत', असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.
एकनाथ शिंदे यांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्म यावरुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. यावर पुढे उद्धव ठाकरे यांनीही पलटवार केला. अनेकजण तडफडत असतात, मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जरा उल्लेख झाला अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण तुम्ही भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाहीत. ज्यांनी ताट भरुन दिलं, त्या पक्षाशी प्रतारणाही केली नाहीत. ताटात जे आहे ते माझंच आहे, पण आणखी मिळावं म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही, असा अपराध तुम्ही केला नाही, त्याबद्दल सगळी जनता तुम्हाला धन्यवाद देत असेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली. ठाकरेंची शिवसेना पक्ष हा आमचा मित्रपक्ष असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या ऑफरच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. 'या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात, त्या तशाच घ्यायला पाहिजेत', असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.