Maharashtra Politics : फडणवीसांची ठाकरेंना ऑफर, शिंदेंना शह देण्यासाठी फडणवीसांची खेळी? ठाकरे ऑफर स्वीकारणार?

Maharashtra : महायुतीत अस्वस्थतेची चर्चा असतानाच फडणवीसांनी ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिलीय... फडणवीस नेमकं काय म्हणाले? आणि ठाकरेंनी फडणवीसांना नेमकं काय उत्तर दिलंय? पाहूयात....
devendra fadnavis uddhav thackeray
devendra fadnavis uddhav thackeraysaam tv
Published On

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात कोण मित्रपक्षात असेल आणि कोण विरोधी पक्षात हे सध्या तरी सांगता येत नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीचे मित्र आणि आत्ताचे अत्यंत कडवे विरोधक असलेल्या उद्धव ठाकरेंना थेट सभागृहातच आपल्या सोबत येण्याची खुली ऑफरच दिलीय...

महायुतीत भाजप आणि शिंदे सेनेत कुरघोडीच्या राजकारणामुळे अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.... त्यामुळे भाजपने पुन्हा आपला मोर्चा जुना मित्र आणि शिंदेंचा कडवा शत्रू असलेल्या ठाकरे सेनेकडे वळवलाय की काय अशी चर्चा ही सुरू झाली.. कारण त्याआधीच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाआधीच फडणवीस आणि ठाकरे समोरासमोर आले.

devendra fadnavis uddhav thackeray
Pune : पुण्याच्या ससून रुग्णालयात राडा! काचा फोडल्या, मशिन्सची तोडफोड अन् सुरक्षारक्षकाला मारहाण

खरंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अधिवेशनात ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरु झालाय... महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची भेट घेत त्यांचा सत्कार केला....एवढंच नाही तर त्यानंतरही आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं समोर आलंय..

devendra fadnavis uddhav thackeray
Maharashtra Politics : सोन्याचा चमचा अन् भरलेलं ताट, विधान परिषदेत एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली

एवढंच नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मोदींचे हात बळकट कऱण्यासाठी ठाकरेंनी सोबत यावं, अशी ऑफर दिलीय... त्यामुळे महायुतीतील अस्वस्थता वाढत असताना भाजपकडून शिंदे सेनेला शह देण्यासाठी ठाकरेंना जवळ केलं जातंय का? आणि एकीकडे राज आमच्यासोबत असं म्हणणारे ठाकरे भाजपच्या आवाहनाला काय प्रतिसाद देणार ? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

devendra fadnavis uddhav thackeray
Maharashtra Politics : शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र! महापालिकेसाठी शिंदेंचा नवा प्रयोग? रिपब्लिकन मतं शिंदेंना तारणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com