
गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर एकापाठोपाठ एक विमान अपघात आणि दुर्घटनांच्या घटना समोर येत आहेत. कधी टेक ऑफ घेतल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड तर कधी आग अशा घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशीच एक घटना लॉस एंजेलिसमध्ये घडली. लॉस एंजेलिसवरून अटलांटाला निघालेल्या विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर अचानक भीषण आग लागली. आग लागल्यामुळे विमानातील प्रवासी चांगलेच घाबरले. पण एमर्जन्सी लँडिंग करत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी लॉस एंजिलेसहून अटलांटाला डेल्टा एअरलाइन्सचे विमान निघाले होते. फ्लाइट DL446 ने टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच विमानाच्या इंजिनमध्ये भीषण आग लागली. उड्डाण घेतलेल्या या विमानाच्या डाव्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. हे पाहून विमानातील प्रवासी चांगलेच घाबरले. पायलटने प्रसंगवधान दाखत विमानाचे तात्काळ लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग केले. त्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या दुर्घटनेत विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सला काहीच दुखापत झाली नाही.
हे विमान फ्लाइट बोईंग 767-400 चे होते. विमानाचे लँडिंग केल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली. महत्वाचे म्हणजे या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच इंजिनमध्ये बिघाड झाला आणि आग लागली. पायलटने ताबडतोब आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आणि विमान पुन्हा विमानतळाकडे वळवले. हवाई वाहतूक नियंत्रणाने देखील तात्काळ मदत केली आणि आपत्कालीन सेवांना सतर्क केले त्यामुळे विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
टेक ऑफ घेतल्यानंतर हे विमान सर्वात आधी पॅसिफिक महासागराकडे गेले. नंतर डाऊनी आणि पॅरामाउंटवरून प्रदक्षिणा घालून विमानतळावर उतरवण्यात आले. विमानाला आग लागल्याचे लक्षात येताच पायलट आणि क्रू मेंबर्सने सर्व आवश्यक तपासणी पूर्ण करत सुरक्षित लँडिंग केले. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. यूएस एव्हिएशन एजन्सीने तपास सुरू केला आहे. हे विमान १५ वर्षे जुने असे सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.