
लंडनमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची घटना घडली. लंडनच्या साऊथएंड एअरपोर्टवर रविवारी हे विमान कोसळलं. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान खाली पडले. विमान पडल्यानंतर भडका उडाला आणि आकाशात काळेकुट्ट धुरांचे लोट पसरले. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनची राजधानी लंडनपासून जवळच असलेल्या लंडन साउथएंड विमानतळावर स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ वाजता हे विमान कोसळले. उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच हे विमान कोसळले. अपघातग्रस्त विमान बिझनेस जेट असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघातग्रस्त विमान बीच बी 200 सुपर किंग एअर होते. हे विमान ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप असलेले होते. या विमानातून जवळपास १२ जण प्रवास करू शकतात ऐवढी क्षमता आहे. हे विमान नेदरलँड्समधील लेलिस्टँडला जात होते. विमानात किती जण होते याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. प्रत्यक्षदर्शींनी या विमान अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.
ESN रिपोर्टने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या विमान अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले. त्यांनी लिहिले की, 'साउथेंड विमानतळावर टेकऑफ दरम्यान बीचक्राफ्ट विमानाचा अपघात झाला. ही घटना विमानतळावर घडली. या विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच एका विमानाने जवळपास ४० मिनिटांपूर्वी धावपट्टीवरून उड्डाण केले होते. आम्ही विमानातील लोकांबद्दल शोक व्यक्त करतो. ही दुर्घटना खूपच दुःखद आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.