टीम इंडियाला मोठा धक्का; विराट कोहलीनंतर रोहित शर्मा ODI सीरीजमधून बाहेर?

rohit sharma news : टीम इंडियाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे.
rohit sharma news
rohit sharma newsSaam tv
Published On
Summary

टीम इंडियाला पुन्हा मोठा धक्का

विराट कोहलीनंतर रोहित शर्मा सीरीजमधून बाहेर जाणार

दोन्ही दिग्गज संघाच्या बाहेर जाण्याच्या शक्यतेने टेन्शन वाढलं

टीम इंडिया लवकरच अफगाणिस्तानविरोधात सीरीज खेळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात संघ अफगाणिस्तानच्या विरोधात खेळणार आहे. या सीरीजमधून विराट कोहली आणि रोहित शर्मा सीरीजमधून बाहेर जाणार असल्याची चर्चा आहे. दोघांच्या फिटनेसवरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

rohit sharma news
World Cup 2027: रोहित शर्माचा वनडे वर्ल्डकपमधून पत्ता होणार कट? BCCI ची चिंता वाढली, नेमकं कारण काय?

रोहित शर्मा हा आयपीएल २०२६ मुंबई इंडियन्ससाठी खेळला. आयपीएलमध्ये खेळताना रोहितला हमस्ट्रिंगची दुखापत झाला. त्यामुळे त्याला अनेक सामने खेळता आले नाही. त्याने काही सामन्यात फलंदाजी केली. परंतु फिल्डिंगला उतरला नाही. आता रोहित शर्माला सीरीजमध्ये खेळायचे असल्यास फिटनेस चाचणी द्यावी लागेल. फिटनेस चाचणी पास झाल्यास रोहितला बीसीसीआयकडून खेळण्यास परवानगी मिळेल.

जैस्वालला संघात स्थान मिळण्याची संधी

रोहित शर्मा जर सीरीज सुरू होण्याआधी फीट नसेल, तर त्याच्याजागी यशस्वी जैस्वालला पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात जैस्वाल हा दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळताना दिसला होता. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळताना फटकेबाजी करताना शतक ठोकलं होतं. त्याने या वर्षी टीम इंडियासाठी ४ सामन्यात १७१ धावा कुटल्या आहेत.

rohit sharma news
Virat Kohli injury: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्तान सिरीजपूर्वीच विराट कोहली बाहेर, काय आहे कारण?

विराट कोहली देखील संघाबाहेर जाणार?

विराटला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे विराटला देखील अफगाणिस्ताविरुद्ध वनडे सीरीज खेळणार नसल्याची शक्यता आहे. हॅमस्ट्रिंगने त्रस्त असलेला विराट कोहली आता थेट न्यूझीलंड दौऱ्यावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, अफगाणिस्तानविरुद्ध होणारी सीरीज ही आगामी वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्वाची मानली जात होती.

rohit sharma news
रोहित शर्मा, हार्दिक पंड्याला अल्टिमेटम; भारतीय संघात सिलेक्शनसाठी १ अट पूर्ण करावी लागणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com