

२०२७ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. मात्र या वर्ल्डकपपूर्वी खास रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण या वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचा टीममध्ये समावेश होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. निवड समिती पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आराखडा तयार करत होती. यावेळी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसबाबत अनिश्चितता दिसून आली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजसाठी दोघांचीही त्यांच्या फिटनेसच्या आधारावर निवड झाली होती. मात्र परंतु 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, बीसीसीआयला रोहित आणि हार्दिक यांच्याबाबत चिंतेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआय यांना हार्दिक वनडेमध्ये पूर्ण १० ओव्हर्सची गोलंदाजी करणार का हा प्रश्न सतावतोय. पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये रोहितच्या फिटनेसबाबत चिंता वाढतेय. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित आयपीएलचे तीन आठवडे खेळू शकला नाही. अशावेळी निवड समितीने त्याच्याकडून फिटनेस रिपोर्ट मागवला आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "रोहित त्या तीन आठवड्यांसाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) हजर झाला नाही. तो आता अधिक फीट झाला असून त्याची बॉडी हाय परफॉर्मेंस स्पोर्ट्सचा लोड सहन करू शकेल की नाही याबद्दल चिंता आहे. त्याला ५० ओव्हर्स फिल्डींग करावी लागणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये आयपीएलप्रमाणे इम्पॅक्ट प्लेयर्सचा नियम नाहीये. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही चाळीशीच्या जवळ असता तेव्हा शरीराला सावरण्यासाठी वेळ लागतो."
सूत्रांनी असंही सांगितलं की, "निवड समितीच्या बैठकीच्या ४८ तास आधी हार्दिकला त्याच्या फीटनेसबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तो २ मे पासून मुंबई इंडियन्सकडून खेळलेला नव्हता. चेन्नईतील सामन्यानंतर त्याला पाठदुखीचा त्रास झाला होता तक्रार केली होती त्यानंतर तो ३ सामने मुंबईसाठी खेळला नाही. केकेआरविरूद्धच्या सामन्यात त्याने कमबॅक केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, तो रिलायन्सच्या फॅसिलिटी आणि वानखेडे स्टेडियमवर सराव करत होता. केकेआरविरूद्धच्या सामन्यात तो परतला खरा मात्र निवड समितीला तो १० ओव्हर्स गोलंदाजी करू शकेल का हा प्रश्न आहे."
२०२७ च्या वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया जास्त वनडे सामने खेळणार नाही. यामध्ये यशस्वी जयस्वालला खेळण्यासाठी पुरेसे सामने मिळालेले नाही. अशातच ईशानची निवड झाली असून ओपनर म्हणून त्याचा विचार केला जाऊ शकतो. जर रोहित वर्ल्डकप खेळू शकला नाही आणि शुभमन गिल किंवा जयस्वाल जखमी झाले तर दुसरा ओपनर तयार असायला हवा असं सूत्रांनी सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.