रोहित शर्मा-विराट कोहलीला मोठा धक्का; दोघांची World Cup 2027 ची वाट बिकट, कारण काय?

rohit sharma and virat kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दोघांची World Cup 2027 ची वाट बिकट असणार आहे.
rohit sharma and virat kohli news
rohit sharma and virat kohli Saam tv
Published On
Summary

विराट आणि रोहितचे क्रिकेट करिअरमधील शेवटचे काही वर्ष

रोहित आणि विराटचं वर्ल्डकप खेळण्याकडे लक्ष

दोघांची वाट बिकट असल्याची चर्चा

विराट कोहली आणि रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय करिअरमधील शेवटचे काही वर्ष राहिले आहेत. दोघांनी टी२० आंतरराष्ट्रीय आणि टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोघे केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतात. सध्या रोहित आणि विराटचं लक्ष्य २०२७ वर्ल्ड कप खेळणे आहे. परंतु बीसीसीआयच्या एका निर्णयाने दोघे वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी गमावू शकतात. बीसीसीआयकडून अजित आगरकर यांना २०२७ वर्षासाठी निवड समितीचे अध्यक्ष करण्याचा प्लान आखला जात आहे.

अजित आगरकर यांचा टीम इंडियाची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जून २०२६ पर्यंत होता. एक्स्प्रेस स्पोर्ट्सच्या माहितीनुसार, बीसीसीआयला अजित आगरकर यांच्या कामाची पद्धत भावली आहे. यामुळे त्यांच्याशी करार एका वर्षांनी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते बीसीसीआयमध्ये जून २०२७ पर्यंत टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर म्हणून राहतील.

rohit sharma and virat kohli news
Virat Kohli: बुलेटच्या वेगात चेंडू सीमेपार; टीम डेविडचा शॉट पाहून चक्रावला कोहली, विराटची रिअ‍ॅक्शन व्हायरल

अजित आगरकर यांच्या कार्यकाळात विराट कोहली आणि रोहित शर्माला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. आगरकर यांच्याशी थेट कनेक्शन नाही. परंतु ऑस्ट्रेलियाविरोधात बॉर्डर गावस्कर सीरीजमध्ये पराभव झाल्यानंतर रोहित आणि विराट कोहलीवर चांगली कामगिरी करण्यासाठी दबाव वाढला होता. त्यानंतर दोघांनी अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अजित आगरकरांच्या नेतृत्वात टेस्ट टीममध्ये बदल होत आहे.

rohit sharma and virat kohli news
Virat Kohli Break To White Ball Cricket: विराट कोहली वनडे, टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? एका निर्णयामुळे चर्चांना उधाण

रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटचे दिग्गज आहेत. परंतु रिपोर्टनुसार, दोघेही कामगिरीच्या जोरावर संघात स्थान टिकून राहणार आहे. अजित आगरकर आणि समिती त्यांच्याबाबत निर्णय घेऊ शकते. फिट राहण्यासाठी सर्व खेळाडूंना घरगुती क्रिकेट खेळावे लागेल. विराट-रोहितने आतापर्यंत अनेक आव्हानांशी सामना केला आहे. परंतु अजित आगरकर यांच्या कार्यकाळात टीममध्ये स्थान कायम ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com