Virat Kohli Break To White Ball Cricket: विराट कोहली वनडे, टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? एका निर्णयामुळे चर्चांना उधाण

Virat Kohli Latest News In Marathi: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विराट कोहली हा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता
virat-kohli
virat-kohlisaam tv news
Published On

Virat Kohli Break To White Ball Cricket:

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विराट कोहली हा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. या स्पर्धेतील ११ सामन्यांमध्ये विराटने ७६५ धावा केल्या होत्या. मात्र फायनलमध्ये त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. दरम्यान क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला आहे.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. सुरुवातीला हे दोन्ही संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत.

त्यानंतर या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान भारतीय संघ या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यास नकारा कळवला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने बीसीसीआयला कळवलं आहे, असं या वृत्तात म्हटलं गेलं आहे. (Latest sports updates)

virat-kohli
IND vs AUS: इथेच चूक झाली! काय आहे टीम इंडियाच्या पराभवाचं नेमकं कारण?

विराट मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून घेणार ब्रेक?

विराट कोहली यापुढे मर्यादित षटाकांचं क्रिकेट खेळणार का? किंवा खेळणार असेल तर केव्हा कमबॅक करणार याबाबत कुठलीही माहीती समोर आलेली नाही. कोहलीने निवडसमिती आणि बीसीसीआयला म्हटलं आहे की, तो केव्हा कमबॅक करेल हे तो स्वत: सांगेल. ही बातमी समोर येताच क्रिकेट चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. काहींचं म्हणणं आहे की, विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटला रामराम करु शकतो.

तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडूनही कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, रोहित शर्माही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून ब्रेक घेऊ शकतो. हे दोघेही कसोटी मालिकेत कमबॅक करताना दिसून येऊ शकतात.

virat-kohli
Ishan Kishan Mistake: एक चूक आणि टीम इंडियाचा पराभव; इशानची अतिघाई टीम इंडियाला महागात पडली

रोहित शर्माला जर या मालिकेतून विश्रांती दिली गेली, तर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. राहुलसह जसप्रीत बुमराह देखील कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. हे दोन्ही संघ ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना १० डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर १७,१९ आणि २१ डिसेंबर रोजी या वनडे सामने खेळवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com