Ishan Kishan Mistake: एक चूक आणि टीम इंडियाचा पराभव; इशानची अतिघाई टीम इंडियाला महागात पडली

India vs Australia 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २२२ धावांचा डोंगर उभारला होता.
ishan-kishan
ishan-kishantwitter
Published On

Ishan Kishan Stumping Mistake:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २२२ धावांचा डोंगर उभारला होता. तरीदेखील भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत होता आणि विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. मात्र मोक्याच्या क्षणी इशान किशनने मोठ्या चुका केल्या. ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Ishan Kishan News In Marathi)

इशान किशनची चुक महागात पडली..

तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सू्र्यकुमार यादवने १९ वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेलला गोलंदाजी करण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेल आणि मॅथ्यू वेड फलंदाजी करत होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर इशान किशनने मॅथ्यू वेडची स्टंपिंग घेतली आणि त्यानंतर अंपायरकडे अपील केली.

ishan-kishan
Suryakumar Yadav Statement: हातचा सामना निसटल्यानंतर सूर्या भडकला; या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

अंपायरने रिप्लेमध्ये पाहिलं तेव्हा दिसून आलं की, इशान किशनने बॉल स्टम्पच्या पुढे पकडला होता. त्यामुळे तो नॉट आऊट तर राहिलाच पण नो बॉल घोषित केल्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. पुढचाच चेंडू फ्री हिट मिळाला आणि याच चेंडूवर मॅथ्यू वेडने षटकार मारला. त्यामुळे जिथे एकही रन येणार नव्हता त्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला सात धावा मिळाल्या. (Latest sports updates)

ishan-kishan
IND vs AUS: ऋतुराज गायकवाडची झुंझार खेळी, टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला २२३ धावांचं आव्हान

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजय मिळवण्यासाठी २१ धावांची गरज होती. भारतीय संघााकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकात ग्लेन मॅक्सवेलने एक षटकार आणि सलग तीन चौकार मारुन संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने या सामन्यात तुफानी शतकी खेळी केली. त्याने १०४ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com