भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. त्याच्या डोळ्यावर, नाकावर गंभीर जखमा झाल्याचं दिसून येत आहे. विराटच्या नाकावर गंभीर पट्टी असल्याचं दिसून येत आहे. विराटने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
विराटचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच क्रिकेट फॅन्सच्या चिंतेत भर पडली आहे. विराटला काय झालं? हे सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. काही तासांनंतर हा फोटो विराटच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काढून टाकण्यात आला आहे. मात्र नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
काय आहे व्हायरल होत असलेल्या फोटोमागचं सत्य?
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये विराट कोहली गंभीर जखमी असल्याचं दिसून येत आहे. मात्र या जखमा खऱ्याखुऱ्या नसून खोट्या आहेत. हा सर्व मेकअपचा खेळ आहे. त्याने हा फोटो पेड पार्टनरशिपसाठी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.
वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर सध्या विराट कोहली सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहे. तो काही दिवस क्रिकेटपासून दुर आहे. मात्र त्याने केलेल्या जाहीरांतीचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आहे. (Latest sports updates)
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी...
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विराट कोहलीने दमदार खेळ केला. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या कामगिरीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली. सध्या टीम मॅनेजमेंटने त्याला विश्रांती दिली आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराटसह केएल राहुल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलसारख्या खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.