भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आज तिसरा टी-२० सामना खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. हा सामना गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या मालिकेत दमदार खेळ केला आहे.
मालिकेतील सुरुवातीचे २ सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसं असेल गुवाहाटीतील हवामान.
अॅक्यूवेदरच्या अंदाजानूसार, २८ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीत पाऊस पडणार नाही. हा सामना भारतीय वेळनूसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. यादरम्यान कमाल तापमान २१ अंश सेल्सियस इतकं राहण्याची शक्यता असणार आहे. तर सामना संपेपर्यंत पारा १९ अंश सेल्सियसपर्यंत घसरु शकतो. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.
कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड..
भारतीय संघाने गुवाहटीच्या मैदानावर आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यादरम्यान २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
तर २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवला होता. २०२० मध्ये भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार होते. मात्र पावसामुळे हा सामना होऊ शकला नव्हता. आता भारतीय संघाला २०१७ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.
या सामन्यासाठी अशी असू शकते ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:
स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट/ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सीन अबॉट, नाथन एलिस, ॲडम झाम्पा, तनवीर संघा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.