भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या नॉकआऊट फेरीत प्रवेश केला. मात्र तिसऱ्यांदा या संघाला वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्यात अपयश आलं आहे. यावेळी वर्ल्डकप स्पर्धेचा थरार भारतात रंगला. भारतीय संघाने फायनल गाठली,मात्र पुन्हा एकदा ट्रॉफीशिवाय रिकाम्या हाती परतावं लागलं आहे. या पराभवानंतर बीसीसीआय रोहितची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान काही महत्वाच्या मुंद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
काय असेल पुढचा प्लान?
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर आता पुढील वर्ल्डकप स्पर्धा २०२७ मध्ये रंगणार आहे. या स्पर्धेची तयारी म्हणून बीसीसीआय आतापासूनच प्लानिंग करत आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकरची भेट घेणार आहे. या भेटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबतही चर्चा केली जाणार आहे. (Rohit Sharma News)
रोहित शर्मा टी-२० क्रिकेट खेळणार का?
येणाऱ्या वर्षात टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी संघ बांधणीला बीसीसीआयने आतापासूनच सुरुवात केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार रोहितने स्पष्ट केलं आहे की जरी टी-२० संघात त्याच्या नावाच विचार केला गेला नाही, तर त्याला कुठलाही आक्षेप नसेल. आगामी वर्ल्डकपासाठी निवडकर्ते युवा खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे रोहितला टी -२० संघात स्थान मिळतं की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest sports updates)
वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेत रोहित खेळणार का?
रोहित शर्मा सध्या ३६ वर्षांचा आहे. पुढील वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत केले जाणार आहे. त्यावेळी रोहित ४० वर्षांचा असेल. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
येणाऱ्या वर्षात भारतीय संघाला केवळ ६ वनडे सामने खेळायचे आहेत त्यामुळे रोहित वनडे क्रिकेट खेळणार की नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.