Bhuvneshwar Kumar: वर्ल्डकपसह 'या' दिग्गज गोलंदाजाची कारकीर्दही संपली! लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकणार रामराम ?

Team India News: भारतीय संघातील हा दिग्गज गोलंदाज लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करु शकतो.
team india
team indiasaam tv news
Published On

Bhuvneshwar Kumar Retirement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या मालिकेसाठी वर्ल्डकप संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

तर काही वरिष्ठ खेळाडूंना दुर्लक्ष केलं गेलं आहे. या खेळाडूंमध्ये अशा एका खेळाडूचा समावेश आहे ज्याने भारतीय संघाला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. आता लवकरच हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो.

एकवेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान मिळणंही कठीण झालं आहे. त्याने कसोटी, वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. (Bhuvneshwar Kumar)

येत्या २३ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. २०२२ मध्ये तो भारतीय संघासाठी शेवटचा टी -२० सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. (Latest sports updates)

team india
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा; 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी

भुवनेश्वर कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दमदार कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करताना सर्वाधिक १६ गडी बाद केले होते. १६ धावा खर्च करत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी होता. दमदार कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.

team india
Ind vs Aus, World Cup 2023: टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न २ चुकांमुळे भंगलं; अन्यथा निकाल काही वेगळाच असता

अशी राहिली कारकीर्द.. (Bhuvneshwar Kumar Stats)

भुवनेश्वर कुमारच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २१ कसोटी सामन्यांमध्ये ६३ गडी बाद केले. २०१८ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. तर १२१ वनडे सामन्यांमध्ये त्याने १४१ गडी बाद केले आहेत. जानेवारी २०२२ मध्ये तो शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com