IPL 2026: १ जागा, ७ सामने अन् ५ संघ...कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट? CSK, KKR, RR अन् पंजाबला किती संधी?

IPL 2026 playoff qualification scenarios: आयपीएल 2026 मध्ये प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक झाली आहे. आरसीबी, गुजरात आणि हैदराबाद पात्र ठरले असून राजस्थान, पंजाब, केकेआर, दिल्ली आणि चेन्नईमध्ये चौथ्या स्थानासाठी जोरदार लढत सुरू आहे.
IPL 2026 playoff qualification scenarios
IPL 2026 playoff qualification scenariossaam tv
Published On

आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यत आता अधिकच रोमांचक झालीये. लीग स्टेजमधील फक्त सात सामने बाकी असताना काही टीमचं भविष्य स्पष्ट झालं असलं तरी काही टीम्ससाठी प्रत्येक सामना आता ‘करो या मरो’सारखा आहे. विशेष म्हणजे, 128 वेगवेगळ्या निकालांच्या शक्यता अजूनही असल्यामुळे प्लेऑफचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.

यंदाच्या सिझनमध्ये लखनऊ सुपर जाएंट्स आणि मुंबई इंडियन्स यांचा प्लेऑफचा प्रवास संपला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये त्याचं स्थान निश्चित केलंय. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानासाठी सर्वात मजबूत दावेदार मानली जातेय. त्यानंतर पंजाब किंग्स यांनाही संधी आहे.

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या टीम्स अजूनही स्पर्धेत आहेत. पण त्यांची शक्यता खूपच कमी झालीये. आरसीबीने केवळ प्लेऑफमध्ये प्रवेशच केला नाही तर पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान निश्चित केलं आहे.

IPL 2026 playoff qualification scenarios
Virat Kohli: विराट कोहलीचा आयपीएलमध्ये विक्रमांचा सिलसिला सुरूच; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

चेन्नईच्या पराभवाने दोन टीम्सना फायदा

सोमवारी सीएसकेविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने मिळवलेल्या विजयामुळे हैदरबाद आणि गुजरात टायटन्स या दोन्ही टीम्सचं प्लेऑफ तिकीट पक्कं झालंय. विशेष म्हणजे या दोन्ही टीम्सना पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानांमध्ये किमान संयुक्तरीत्या राहण्याची तब्बल 75 टक्के शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सकडे टॉप-4 मध्ये पोहोचण्याची 43.8 टक्के शक्यता आहे. इतकंच नाही तर राजस्थान अजूनही एसआरएच आणि जीटीसोबत संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकते. मात्र अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता फक्त 6.3 टक्के आहे.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्ससाठी चौथं स्थान मिळवण्याची शक्यता 28.1 टक्के आहे. तसंच केकेआरसोबत संयुक्त चौथ्या स्थानावर राहण्याची 10.9 टक्के शक्यता देखील आहे.

IPL 2026 playoff qualification scenarios
Ederson: भयंकर! गेल्या ८ वर्षांपासून एकच अंडरवेअर घालून खेळतोय फुटबॉल स्टार; कारण ऐकून धक्का बसेल

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सच्या बाबतीत पाहिलं तर त्यांना एकट्याने किंवा संयुक्तरीत्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची एकूण शक्यता 20.3 टक्के आहे. जर केकेआर चौथ्या स्थानासाठी बरोबरीत आली तर ती लढत पंजाबसोबत असू शकते.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सची परिस्थितीही जवळपास अशीच आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची एकूण शक्यता 18.8 टक्के असून त्यांच्यासाठी सर्वोत्तम स्थिती म्हणजे एकट्याने चौथ्या स्थानावर राहणं. मात्र त्याची शक्यता फक्त 3.1 टक्के आहे.

IPL 2026 playoff qualification scenarios
IPL 2026: पडलेला चेहरा, पाणावलेले डोळे...! ६ पराभवानंतर प्रीती झिंटा अय्यरमध्ये गंभीर चर्चा, डगआऊटमध्ये पाँटिंगही अस्वस्थ

सोमवारी झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सची परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. सीएसकेसाठी शक्यता म्हणजे राजस्थान किंवा दिल्लीसोबत किंवा दोघांसोबत संयुक्त चौथ्या स्थानावर राहणं. पण अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता केवळ 14.1 टक्के आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com