Virat Kohli: विराट कोहलीचा आयपीएलमध्ये विक्रमांचा सिलसिला सुरूच; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

Virat Kohli New IPL Record: विराट कोहलीने आयपीएल २०२६ मध्ये ५०० रन्स पूर्ण करत इतिहास रचला आहे. नऊ वेगवेगळ्या सीझनमध्ये ५००+ रन्स करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे.
Virat Kohli New IPL Record
Virat Kohli New IPL Recordsaam tv
Published On

आयपीएल २०२६ मध्ये सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू खूप चांगली कामगिरी करतेय. इतकंच नाही तर विराट कोहली देखील चांगली कामगिरी करतोय. ज्यावेळी विराट मैदानावर उतरतो तेव्हा कोणता ना कोणता रेकॉर्ड होतोच. असंच आयपीएल २०२६ मधील आरसीबीच्या जवळपास प्रत्येक सामन्यात ही गोष्ट खरी ठरतेय.

आज धर्मशालामध्ये पंजाब किंग्सविरुद्ध फलंदाजीला येऊन कोहलीने इतिहास रचला. या सामन्यापूर्वी कोहलीने १२ सामन्यांमध्ये ४८४ रन्स केले होते. तर पंजाबविरुद्धच्या १६ रन्ससह त्याने या सिझनमध्ये ५०० रन्स पूर्ण करून इतिहास रचला.

Virat Kohli New IPL Record
IPL Playoff Scenario: पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नई-कोलकात्याला, वाचा ८ संघाचे प्लेऑफचे नेमकं गणित

विराट कोहलीचा नवा विक्रम

कोहलीने एक असा नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. विराटचा हा विक्रम इतर कोणत्या फलंदाजाकडून मोडीत निघेल याची शक्यता कमी आहे. विराट कोहली हा इतिहासातील एकमेव फलंदाज ठरला आहे, ज्याने नऊ वेगवेगळ्या आयपीएल सिझनमध्ये ५०० किंवा त्याहून अधिक रन्स केले आहेत.

कोहलीने २०११, २०१३, २०१५, २०१६, २०१८, २०२३, २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये ५०० पेक्षा जास्त रन्स केलेत. ईडन गार्डन्सवर केकेआरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराटने शतक झळकावलं होतं. कोहलीने त्या सामन्यात अवघ्या ६० बॉल्समध्ये नाबाद १०५ रन्स केले होते. तर आज पंजाबविरुद्ध ३७ चेंडूंमध्ये ५८ रन्सची खेळी केली.

Virat Kohli New IPL Record
IPL 2026 Playoff Scenario: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कशी जाणार? जाणून घ्या समीकरण

सचिनचा महारेकॉर्ड तोडला

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी एकाच आयपीएल सिझनमध्ये ५०० पेक्षा जास्त रन्स करण्याचा विक्रम त्याने सचिन तेंडुलकरच्या पुढे नेला आहे. सचिनने हा पराक्रम दोनदा केला होता तर कोहलीने तीनदा हा पराक्रम करून इतिहास रचलाय.

Virat Kohli New IPL Record
Playoffs Scenarios: ...तर प्लेऑफच्या उंबरठ्यावर असूनही RCB होणार बाहेर; या समीकरणाने बंगळूरूचा खेळ फिस्कटणार

वयाच्या ३५ वर्षांनंतर सर्वाधिक ५०० पेक्षा जास्त रन्स करणारे खेळाडू

  • विराट कोहली - 3 वेळा (2024, 2025, 2026)

  • सचिन तेंडुलकर - 2 वेळा

  • फाफ डू प्लेसिस - 2 वेळा

  • सनथ जयसूर्या - 1 वेळा

  • मायकेल हसी - 1 वेळा

  • डेव्हिड वॉर्नर - 1 वेळा

  • शिखर धवन - 1 वेळा

  • शेन वॉटसन - 1 वेळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com