IPL 2026 Playoff Scenario: मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कशी जाणार? जाणून घ्या समीकरण

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल पॉईंट्स टेबल

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाहिलं तर मुंबई इंडियन्स परिस्थिती फारच बिकट आहे. अशावेळी चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की टीम प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? परिस्थिती कठीण असली तरी शक्यता पूर्णपणे मावळलेल्या नाहीत.

Mumbai Indians playoff chances

मुंबई इंडियन्सची कामगिरी

मुंबईने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यात फक्त 2 विजय मिळवले आहेत. तर 5 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 4 पॉईंट्स असून ते नवव्या स्थानावर आहेत.

MI qualification scenario

प्लेऑफसाठी कसं गाठणार?

जर मुंबईला प्लेऑफ गाठायचं असेल तर समीकरण अगदी स्पष्ट आहे. मुंबईला उरलेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. त्यांना उरलेल्या 7 पैकी किमान 5 किंवा 6 सामने जिंकणं गरजेचं आहे.

IPL playoff maths

सर्व सामने जिंकले तर..

जर मुंबईने उरलेले सर्व 7 सामने जिंकले तर त्यांचे 18 गुण होतील. अशा परिस्थितीत त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित होईल. हा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो.

Mumbai Indians performance

14 पॉईंट्स झाले तर?

जर टीमने फक्त 5 सामने जिंकून 14 गुण मिळवले, तर प्लेऑफची स्पर्धा खूपच कठीण होणार आहे. अशा वेळी नेट रन रेट खूप महत्त्वाचं ठरतं. फक्त विजय नव्हे, तर मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे.

IPL standings

इतर संघांची कामगिरी

मुंबईला स्वतःची कामगिरी सुधारण्याबरोबरच इतर टीमच्या निकालांवरही लक्ष ठेवावं लागेल. प्लेऑफ गाठण्यासाठी इतर टीम्सचं नेट रन रेट वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे

cricket playoff analysis

पंजाब किंग्जचं तिकीट निश्चित

यंदाच्या सिझनमध्ये पंजाब किंग्ज प्लेऑफ गाठण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. त्यांनी ८ सामने खेळले असून त्यापैकी केवळ एका सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यांच्या खात्यात १३ पॉईंट्स आहेत.

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

fort architecture India
येथे क्लिक करा