Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Surabhi Jayashree Jagdish

रायगड

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार हा केवळ प्रशासनाचा केंद्रबिंदू नव्हता, तर वास्तुकलेचा अद्भुत नमुनाही होता. दरबारापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या नगरखान्यातील हलकी कुजबूजही दरबारात ऐकू येत असल्याची माहिती इतिहासात आढळते.

Shivaji Maharaj darbar

अकौस्टिक इंजिनिअरिंग

हे शक्य होण्यामागे किल्ल्याच्या रचनेत वापरलेली उत्कृष्ट ध्वनीशास्त्रीय योजना होती. त्या काळातील आर्किटेक्टर्सनी ध्वनीच्या प्रवासाचा विचार करून ही रचना केली होती. ज्याला आज 'अकौस्टिक इंजिनिअरिंग' असं म्हणतात.

Raigad architecture

रायगडाच्या राजदरबाराची विशेष रचना

रायगडावरील राजदरबार आणि नगरखाना यांची रचना सरळ रेषेत करण्यात आली होती. या मांडणीमुळे दरवाजातून निर्माण होणारा आवाज थेट दरबाराच्या दिशेने येत. मोकळ्या आणि लांब मार्गामुळे आवाज कमी न होता पुढे पोहोचायचा

ancient acoustic engineering

दगडी भिंतींचा उपयोग

दरबार आणि मार्गातील भिंती मोठ्या दगडांच्या बांधकामातून तयार केल्या होत्या. दगडात आवाज रिफ्लेक्ट करण्याची क्षमता होती. त्यामुळे आवाज पुढे ढकलला जायचा. यामुळे हलका आवाजही कमी न होता पुढील जागी पोहोचू शकतो.

Raigad nagarkhana

सरळ मार्ग

नगरखाना ते दरबार यामधील मार्गात वळणं कमी ठेवण्यात आली होती. सरळ मार्गामुळे ध्वनीलहरी अडथळ्यांशिवाय पुढे जाऊ शकत होत्या. ही पद्धत आजच्या आधुनिक ऑडिटोरियम डिझाइनमध्येही वापरली जाते.

Raigad fort design

दरबारातील आसन व्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराज ज्या सिंहासनावर बसत ते ठिकाण ध्वनी ऐकू येईल अशा मध्यभागी होतं. दरबारातील मोकळ्या जागेमुळे प्रतिध्वनी कमी होत असे. यामुळे दूरचा आवाज स्पष्ट ऐकू येण्यास मदत होत असे.

fort architecture India

सुरक्षा आणि गुप्त माहिती

या ध्वनी रचनेचा उपयोग सुरक्षेसाठीही होत होता असं इतिहासकार सांगतात. प्रवेशद्वाराजवळील हालचाली किंवा चर्चा दरबारापर्यंत पोहोचू शकत. यामुळे राजाला बाहेरील घडामोडींची कल्पना मिळण्यास मदत व्हायची.

historic sound engineering

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

What happened after Afzal Khan was killed | saam tv
येथे क्लिक करा