Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफझलखानाचा वध केल्यानंतर प्रतापगड किल्ला परिसरात उभ्या असलेल्या विजापुरी सैन्यावरही अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शत्रूची छावणी ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात हत्ती, घोडे, उंट, शस्त्रे आणि खजिना लुटला.
अफझलखानाच्या छावणीतून सुमारे ६५ हत्ती मराठ्यांच्या ताब्यात आले. हत्ती त्या काळात युद्धातील सर्वात महत्त्वाचं साधन मानलं जात होतं. या संपत्तीमुळे मराठा सैन्याची युद्धक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली.
४,००० पेक्षा जास्त घोडे मराठ्यांनी हस्तगत केले असल्याचा उल्लेख आहे. घोडदळ हे शिवाजी महाराजांच्या लढाऊ नीतीसाठी महत्त्वाचं होतं. या घोड्यांमुळे स्वराज्याचे वेगवान सैन्य अधिक सक्षम झाले.
त्यावेळी सुमारे १,२०० उंट मराठा सैन्याला मिळाले. उंटांचा वापर सामान वाहतूक व पुरवठा व्यवस्थेसाठी केला जात असे. यामुळे स्वराज्याच्या रसद व्यवस्थेला मोठी मदत झाली.
अफझलखानाच्या छावणीतून सुमारे ३०० पालख्या मिळाल्या. याशिवाय तंबू, सजावटीचे साहित्य आणि शाही छावणीचे सामानही ताब्यात घेण्यात आलं. या वस्तू शत्रूच्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानल्या जात होत्या.
हजारो तलवारी, भाले, ढाली आणि चिलखत मराठ्यांना मिळालं. या शस्त्रांमुळे स्वराज्याच्या सैन्याला लगेत बळकटी मिळाली. नवीन सैन्य उभारणीसाठी ही संपत्ती उपयुक्त ठरली.
अफझलखानाच्या छावणीत मोठ्या प्रमाणात रोकड, सोने-चांदी आणि रत्नं मिळाली. हा खजिना स्वराज्याच्या आर्थिक मजबुतीसाठी निर्णायक ठरला. यामुळे पुढील किल्ले बांधकाम व सैन्यवाढ शक्य झाली.
ही संपूर्ण माहिती life of siva chhatrapati या पुस्तकातून घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देण्यात आलेली आहे.