IPL Playoff Scenario: पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नई-कोलकात्याला, वाचा ८ संघाचे प्लेऑफचे नेमकं गणित

IPL Points Table: दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा पराभव करत आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक केली आहे. आरसीबी, गुजरात आणि हैदराबाद समान गुणांसह आघाडीवर आहेत, तर चेन्नई, राजस्थान आणि कोलकात्याचीही प्लेऑफसाठी जोरदार लढत सुरू आहे.
IPL Points Table
IPL Points Tablesaam tv
Published On

आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी पंजाब किंग्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पंजाब किंग्सला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने धर्मशालामध्ये दिल्लीने तीन विकेट्स राखून विजय मिळवला.

सलग चौथ्या पराभवामुळे पंजाबचा प्लेऑफमधील मार्ग आता काहीसा कठीण झाल्याचं पाहायला मिळतंय. पंजाब कॅपिटल्सच्या या पराभवामुळे प्लेऑफची शर्यत अधिकच रोमांचक झालीये. लखनऊ सुपर जाएंट्स आणि मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यात. तर आता उरलेल्या आठ टीम्ससाठी प्लेऑफचं समीकरण कसं आहे ते जाणून घेऊया.

IPL Points Table
Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

तीन टीम्सने पॉईंट्स समान

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांचे पॉईंट्स सारखे आहेत. त्यामुळे प्लेऑफची शर्यत रोमांचक झालीये. या तिन्ही टीम्सने ११ सामने खेळून सात जिंकले असून त्यांचे प्रत्येकी १४ गुण आहेत. त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत आणि प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना किमान एक सामना जिंकावाच लागणार आहे. परंतु या गोष्टी रनरेटवर अवलंबून असू शकतात. प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी सर्व टीम्सना प्रत्येकी दोन सामने जिंकणं गरजेचं आहे.

चेन्नई-राजस्थानची काय स्थिती?

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी आतापर्यंत प्रत्येकी ११ सामने खेळले असून त्यापैकी सहा जिंकले आहेत. दोन्ही टीम्सचे प्रत्येकी १२ पॉईंट्स आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना किमान १६ पॉईंट्स मिळवावे लागणार आहे. यासाठी दोन्ही टीम्सना त्यांच्या पुढील तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकावे लागतील. जर या टीम्सना प्रथम स्थान गाठायचं असेल तर सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

IPL Points Table
IPL 2026 : चेन्नईला मोठा धक्का; दुखापतीमुळे हा गेमचेंचर खेळाडू IPL मधून बाहेर

दिल्ली कॅपिटल्स देखील शर्यतीत

सोमवारच्या सामन्यात दिल्लीने पंजाबला ३ विकेट्स राखून पराभूत केलं. यामुळे दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत. दिल्लीने ११ सामने खेळून त्यापैकी ५ जिंकले आहेत. जर त्यांनी आपले उर्वरित ३ सामने जिंकले तर ते १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. तरीही दिल्लीचा प्लेऑफपर्यंतचा मार्ग खूप कठीण आहे. कारण त्यांना इतर टीम्सवर अवलंबून राहावं लागणार आहे.

IPL Points Table
ICC Ranking : आयसीसी टी २० रँकिंग जाहीर; टीम इंडिया कितव्या स्थानी?, टॉप १० संघ कोणते?

कोलकात्यासाठी कसं आहे समीकरण?

कोलकाता नाइट रायडर्सची यंदाच्या वेळी सुरुवात फारच निराशाजनक होती. मात्र टीमने शेवटचे सलग चार सामने जिंकलेत. त्यांनी १० सामन्यांमधून ९ गुण मिळवले असून चार सामने जिंकले आहेत आणि एक सामना पावसामुळे गमावला आहे. जर कोलकात्याने उर्वरित सर्व सामने जिंकले तर ते १७ गुणांपर्यंत पोहोचून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com