IPL 2026 : चेन्नईला मोठा धक्का; दुखापतीमुळे हा गेमचेंचर खेळाडू IPL मधून बाहेर

CSK team news: IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
CSK team news
CSK team newsSAAM TV
Published On

आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीमचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झाला आहे. नुकतीच टीम विजयाच्या मार्गावर परतली होती. मात्र आता खलील अहमद बाहेर गेल्याने चिंता वाढली आहे

खलील अहमद दुखापतीमुळे बाहेर

डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद क्वाड्रिसेप्स इंजरीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चौथा ओव्हर टाकताना त्याला ही दुखापत झाली. त्यावेळी त्याने उजव्या हिपमध्ये वेदना जाणवल्याची तक्रार केली होती. तो ओव्हर पूर्णही करू शकला नव्हता.

CSK team news
RCB vs SRH Update : आयपीएलचा महासंग्राम उद्यापासून, बेंगळुरू-हैदराबाद यांच्यात पहिलीच लढत, लाइव्ह कुठे बघता येणार?

मीडिया रिपोर्टनुसार, खलीलला ग्रेड 2 इंजरी झाली आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला सुमारे 10 ते 12 आठवडे म्हणजे जवळपास 3 महिने रिहॅब करावा लागणार आहे.

IPL 2026 मधील खलीलची कामगिरी

या सिझनमध्ये खलील अहमदने आतापर्यंत 5 सामने खेळले होते. या 5 सामन्यांमध्ये त्याने 73 च्या सरासरीने फक्त 2 विकेट्स घेतल्यात. त्याचा इकॉनॉमी रेट 8.67 इतका आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी त्याला 4.8 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं.

CSK team news
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहमुळे मुंबईचा सलग ३ रा पराभव; आकडे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

CSK च्या गोलंदाजीवर वाढला ताण

खलील अहमदच्या गैरहजेरीमुळे आता CSK च्या वेगवान गोलंदाजीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सध्या गुरजपनीत सिंग, अंशुल कंबोज आणि जेमी ओव्हर्टन यांच्यावर मुख्य जबाबदारी असणार आहे. यापूर्वीच नाथन एलिस देखील दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. मॅट हेन्रीही सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत मुकेश चौधरी आणि रामकृष्ण घोष यांसारख्या अनकॅप्ड खेळाडूंना संधी मिळू शकते. चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना 18 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

CSK team news
IPL 2026: चिन्नास्वामीवर आज रंगणार IPL चा महासंग्राम, पाहा किती वाजता सुरु होणार सामना, कशी असेल प्लेईंग ११?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com