

वानखेडेच्या मैदानावर आरसीबी विरूद्धचा सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्ससमोर एक मोठी चिंता उभी राहिलीये. या चिंतेचं कारण आहे टीमचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह...आयपीएलच्या १९ व्या सिझनमध्ये बुमराहची कामगिरी फारच निराशाजनक आहे. मुंबईने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत आणि पाचही सामन्यांमध्ये विकेट्सच्या बाबतीत बुमराहची पाटी कोरी आहे. कधीकाळी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या बुमराहला या सिझनमध्ये अजून एकही विकेट पटकावता आलेली नाही.
रविवारी वानखेडेच्या मैदानावर आरसीबी विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने १८ रन्सने जिंकला. या सामन्यात देखील बुमराहला गोलंदाजीमध्ये महागही पडला शिवाय त्याला विकेटही काढता आली नाही. या सामन्यात बुमराहने ४ ओव्हरमध्ये ३५ रन्स दिलेत.
गेल्या काही आयपीएल सामन्यांची आकडेवारी पाहता बुमराहची कामगिरी फारच निराशाजनक आहे. आयपीएल 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध त्याने 4 ओव्हरमध्ये 40 रन्स दिलेत. त्यानंतर आयपीएल 2026 मध्ये वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 35 रन्स दिलेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स दिलेत. तर गुवाहाटीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो पूर्ण 4 ओव्हरही टाकू शकला नाही आणि 3 ओव्हर्समध्ये 32 रन्स दिलेत.
आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच बुमराह सलग 5 सामन्यांत एकही विकेट घेऊ शकलेला नाही. ही बाब मुंबई इंडियन्ससाठी फारच चिंतेची बाब मानली जातेय. बुमराहने टी-20 वर 2026 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. बुमराह आणि वरुण चक्रवर्ती 14 विकेट घेतल्या होत्या.
रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला 18 रन्सने पराभूत केलं. हा मुंबईचा सलग तिसरा पराभव ठरला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 240 रन्सचा भक्कम डोंगर उभारला होता. या मोठ्या स्कोरचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने चांगला प्रयत्न केला. पण तरीही टीमला 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 222 रन्सपर्यंतच मजल मारता आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.