RCB vs SRH Update : आयपीएलचा महासंग्राम उद्यापासून, बेंगळुरू-हैदराबाद यांच्यात पहिलीच लढत, लाइव्ह कुठे बघता येणार?

IPL 2026, RCB vs SRH : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. हा सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार, तसेच लाइव्ह कुठे बघता येणार हे जाणून घेऊयात...
आयपीएलचा महासंग्राम उद्यापासून, पहिला सामना कधी आणि कुठे लाइव्ह बघता येणार?
IPL 2026, RCB vs SRHsaam tv
Published On

ज्याची वर्षभरापासून क्रिकेट चाहते आतुरतेने वाट बघत असतात तो IPL 2026 चा कुंभमेळा उद्यापासून (शनिवार, २८ मार्च) सुरू होत आहे. क्रिकेटच्या महासंग्रामाची सुरुवात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामन्यानं होणार आहे. तब्बल दोन महिने आयपीएलचा थरार अनुभवता येणार आहे.

आयपीएलचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. हा सामना किती वाजता, कुठे आणि कोणत्या चॅनलवर लाइव्ह बघता येणार आहे, याची माहिती क्रिकेट चाहत्यांना असायला हवी. पहिलाच सामना किती वाजता सुरू होणार, टीव्ही आणि मोबाइलवर लाइव्ह कसा बघता येईल, हे जाणून घेऊयात.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात बेंगळुरू संघानं गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. पहिल्या ट्रॉफीसाठी आरसीबी संघाला तब्बल १७ वर्षे वाट बघावी लागली होती. यंदा आयपीएलची ट्रॉफी डिफेंड करण्यासाठी आरसीबीचा संघ मैदानात उतरणार आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीचा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत होणार आहे. सध्या हैदराबाद संघ धाकड असल्याचं मानलं जात आहे. तर आरसीबीचा संघही तुल्यबळ आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे हा सामना आरसीबीच्या होमग्राउंडवर होणार आहे.

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : सामना कधी आणि कुठे होणार?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. आयपीएलमधील बहुतांश सामने हे संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत संपतील. आयपीएलचा पहिलाच सामना बेंगळुरूत संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी सात वाजता नाणेफेक होईल. त्याचवेळी दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन कसे असतील याची माहिती मिळेल. अखेरच्या षटकापर्यंत सामना रंगला तर हा सामना संपायला रात्रीचे साडेअकरा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आयपीएलचा महासंग्राम उद्यापासून, पहिला सामना कधी आणि कुठे लाइव्ह बघता येणार?
IPL 2026 : आयपीएल सुरू होण्याआधीच बीसीसीआयचा मोठा निर्णय; नेमकं घडलं तरी काय?

लाइव्ह सामना कुठे बघता येणार?

आरसीबी आणि एसआरएच यांच्यातील पहिला सामना टीव्ही किंवा मोबाइलवर लाइव्ह कसा बघता येईल हे जाणून घ्यायला हवं. गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल सामन्यांच्या लाइव्ह टेलिकास्टचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. यंदाही हे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडेच आहेत. हा सामना टीव्हीवर लाइव्ह बघायचा असेल तर, स्टार स्पोर्ट्सवर जाऊन सामन्याचा थरार अनुभवता येईल. तर मोबाइलवर जियो हॉट स्टारवर हे सामने लाइव्ह बघता येतील. स्मार्ट टीव्हीवर जियो हॉट स्टारवर जाऊन हे सामने बघता येतील.

आयपीएलचा महासंग्राम उद्यापासून, पहिला सामना कधी आणि कुठे लाइव्ह बघता येणार?
IPL Schedule : १२ ठिकाणं, ५० सामने, ८ डबल हेडर मॅच; आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com