

इंडियन प्रिमियर लीगला आजपासून सुरु होणार आहे. 19 व्या सिझनमध्ये पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर त्यांच्या घरच्या मैदानावर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामना जिंकून विजयी श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न करणार आहे.
तर दुसरीकडे सनरायझर्सने आतापर्यंत केवळ २०१६ मध्ये एकदाच आयपीएलच्या ट्रॉफीला गवसणी घातली होती. सध्या पॅट कमिंस दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून टीममधून बाहेर आहे. त्यामुळे कर्णधार पदाची धुरा इशान किशनकडे सोपवण्यात आलीये. दरम्यान आजच्या सामन्याची प्लेईंग ११ आणि पीच कसं असणार आहे याची माहिती घेऊया.
बंगळूरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर यंदाच्या सिझनचा पहिला सामना रंगणार आहे. या सामन्याचा टॉस संध्याकाळी सात वाजता होणार असून साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या होम ग्राऊंड असलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत १०० आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमने आतापर्यंत ४३ वेळा तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीमने ५३ वेळा विजय मिळवला आहे. या मैदानावर ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक स्कोर करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद १७५ रन्स केले होते.
विराट कोहली , फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, जेकब डफी, मंगेश यादव, भुवनेश्वर कुमार.
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.