MS Dhoni injury: आयपीएल 2026 सुरू होण्याआधीच CSK ला मोठा धक्का; धोनी संघातून बाहेर, धक्कादायक कारण समोर

MS Dhoni injury update IPL 2026: आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. एमएस धोनी काफ दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत सीएसकेची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MS Dhoni injury update IPL 2026
MS Dhoni injury update IPL 2026saam tv
Published On

आयपीएलच्या १९ व्या सिझनला आजपासून सुरूवात होणार आहे. आज रॉयल चॅलेंजर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र आयपीएलला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. टीमचा सर्वात अनुभवी आणि महत्त्वाचा खेळाडू एमएस धोनी सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धोनीच्या काफमध्ये समस्या जाणवत असल्याने तो सुमारे दोन आठवडे खेळू शकणार नाहीये. शनिवारी 28 मार्च रोजी सीएसके फ्रँचायझीने याबाबत अधिकृत माहिती दिलीये. त्यामुळे सिझनच्या सुरुवातीच्या टप्प्यातच टीमला मोठा धक्का बसला आहे.

MS Dhoni injury update IPL 2026
IPL Schedule : १२ ठिकाणं, ५० सामने, ८ डबल हेडर मॅच; आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

रिपोर्टनुसार, धोनी या सिझनमधील पहिले चार सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान त्याच्या अनुपस्थितीत विकेटकीपिंगची जबाबदारी कोण सांभाळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यासाठी संजू सॅमसन किंवा उर्विल पटेल यांच्यापैकी एका खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या सामन्यांमध्ये खेळणार नाही धोनी?

  • 30 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

  • 3 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स

  • 5 एप्रिल – आरसीबी विरुद्ध सीएसके

  • 11 एप्रिल – सीएसके विरुद्ध दिल्ली

MS Dhoni injury update IPL 2026
IPL Schedule : १२ ठिकाणं, ५० सामने, ८ डबल हेडर मॅच; आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

धोनीने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो सातत्याने फक्त आयपीएलमध्ये खेळतोय. मागील सिझनमध्ये त्याने सर्व 14 सामने खेळले होते आणि 135 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 196 रन्स केले होते केल्या होते. ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर गेल्यावर त्याने पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळली होती.

MS Dhoni injury update IPL 2026
IPL 2026: मुंबई इंडियन्सची ताकद आणखी वाढणार; स्टार खेळाडूची संघात एन्ट्री

दरम्यान आता सीएसकेला आपल्या सर्वात मोठ्या स्टार आणि अनुभवी खेळाडूशिवाय सुरुवातीचा टप्पा पार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनीशिवाय टीम कशी कामगिरी करते हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com