IPL 2026: मुंबई इंडियन्सची ताकद आणखी वाढणार; स्टार खेळाडूची संघात एन्ट्री

Jasprit Bumrah join Mumbai Indians IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई इंडियन्समध्ये आता स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहची एन्ट्री झाली आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahSaam Tv
Published On
Summary

आयपीएस २०२६ सुरु होणार

मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमराहची एन्ट्री

फिटनेसबाबत काळजी करण्याची गरज नाही

आयपीएलचा १९वा सीझन उद्यापासून सुरु होणार आहे. आयपीएस सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आहे. स्पोर्टस्टार रिपोर्टनुसार, आता जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. २९ मार्च रोजी पहिली मॅच होणार आहे. त्याआधीच जसप्रीत बुमराह संघात दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Jasprit Bumrah
RCB Update : IPL सुरू होण्याआधीच विराटच्या बेंगळुरू संघाला मोठा झटका, आणखी एक खेळाडू स्पर्धेतून आऊट

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्समध्ये दाखल (Jasprit Bumrah Join Mumbai Indians for IPL 2026)

जसप्रीत बुमराह हा सेंटर ऑफ एक्सलेन्स येथे गेला होता. त्यानंतर त्यांच्या फिटनेसबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. मिडिया रिपोर्टनुसार, बुमराह बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये आपल्या फिटनेसवर काम करत होता. बुमराहला कोणतीही दुखापत झालेला नाही. परंतु वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून त्याने स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगवर काम करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सीलेन्सला भेट दिली होती. यानंतर बुमराह आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (MI) संघात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयचा नियम (BCCI Rule)

बीसीसीआयच्या वार्षिक करारानुसार आयपीएल सुरु होण्याआधी खेळाडूंना सेंटर ऑफ एक्सलन्सला भेट द्यावी लागले. तिथे त्यांच्या फिटनेसचा आढावा घेतला जातो. त्यात जे खेळाडू उत्तीर्ण होतात तेच आयपीएलमध्ये खेळू शकतात. यामुळेच बुमराहला मुंबई इंडियन्स संघात दाखल होण्यास उशिर होत होता.

Jasprit Bumrah
IPL सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयची मोठी कारवाई; 2 कोटींच्या सलामीवीर फलंदाजावर 2 वर्षे बंदी, वाचा कारण

गोलंदाजीचा सराव

बंगळुरुत असताना बुमराहने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. वर्ल्ड कपमध्ये बुमराहने चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर बुमराहच्या स्पर्धासंदर्भातील नियोजनदेखील करण्यात आले आहे. बुमराह बंगळुरुतील केंद्रात सराव करत होता. त्यानंतर आता तो पुन्हा संघात सामील झाला आहे.

Jasprit Bumrah
IPL Schedule : १२ ठिकाणं, ५० सामने, ८ डबल हेडर मॅच; आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com