

येत्या शनिवारपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापूर्वीच एका खेळाडूवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. बेन डकेटने आयपीएल २०२६ सुरु होण्यापू्र्वी माघार घेतली. त्यामुळे बीसीसीआयने या इंग्लिश खेळाडूवर थेट बंदीची कारवाई केली आहे. बेन डकेट दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरणार होता.
इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटने आयपीएल २०२६ मधून माघार घेतली. तो दिल्ली कॅपिटल्ससाठी केएल राहुलसोबत ओपनिंगाला उतरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र बेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदाच्या आयपीएलमधून माघार घेत असल्याची माहिती दिली. ज्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर २ वर्षांची बंदी घातली आहे.
आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ने बेन डकेटला २ कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. दरम्यान २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी बीसीसीआयने काही नियम तयार केले होते. त्यानुसार आता डकेटने सिझन सुरु होण्यापूर्वी माघार घेतल्याने त्यांच्यावर २ वर्षांच्या बंदीची कारवाई कऱण्यात आली आहे. त्यामुळे आता तो पुढील २ वर्ष आयपीएल खेळू शकणार नाही किंवा ऑक्शनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
आयपीएल २०२६ मधून माघार घेतल्यानंतर बेन डकेटने स्टेटमेंट जाहीर केलं आहे. त्याने म्हटलं की, आयपीएलमधून माघार घेण्याचा खूप मोठा आणि कठीण निर्णय मला घ्यावा लागतोय. मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोप नव्हतं.
बेन डकेटच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडकडून खेळणं हे त्याचं लहानपणापासूनचे स्वप्न आहे. उन्हाळ्याचा सिझन सुरु होण्यापूर्वी होण्यापूर्वी त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हायचंय. जेणेकरून तो इंग्लंडसाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकणार आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स टीमची आणि त्यांच्या चाहत्यांची माफीही मागितली.
ॲशेस सिरीजमध्ये बेन डकेटची कामगिरी निराशाजनक होती. तो १० डावांमध्ये २०.२० च्या सरासरीने केवळ २०२ रन्सच करू शकला होता. अशावेळी तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.