

वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघानं क्रिकेट विश्वावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टी २० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिलं स्थान अबाधित ठेवलं आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे एकेकाळचे दिग्गज संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. भारतीय संघानं सगल दोनदा टी २० वर्ल्डकप जिंकला आहे. आतापर्यंत तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे.
आयसीसीनं आपल्या वेबसाइटवर याबाबत अपडेट दिली आहे. मे २०२५ नंतर खेळवण्यात आलेल्या सर्व सामन्यांमधील १०० टक्के कामगिरी आणि त्याच्या आधीच्या दोन वर्षांतील सामन्यांतील ५० टक्के कामगिरीच्या आधारे ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. २७५ गुणांसह अव्वल स्थानी भारत, तर इंग्लंड २६२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २५८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
भारतीय संघ टी २० रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. कारण मागील दोन वर्षांत भारतीय संघाने टी २० क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२४ आणि वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले आहे. तर या दोन टी २० वर्ल्डकप स्पर्धांच्या मधल्या कालावधीत झालेल्या सर्व टी २० मालिकाही भारतानं जिंकल्या आहेत. ताज्या टी २० रँकिंगमध्ये अव्वल सात संघांच्या स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. टी २० रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी न्यूझीलंड (२४७ गुण), पाचव्या स्थानी दक्षिण आफ्रिका (२४४ गुण), सहाव्या स्थानी पाकिस्तान (२४०) आणि सातव्या स्थानी वेस्ट इंडीज (२३३ गुण) आहे.
ताज्या क्रमवारीत बांगलादेशच्या संघाला एका गुणाचा फायदा झाला आहे. सध्या बांगलादेश संघ आठव्या स्थानी आहे. तर श्रीलंकेचं ६ गुणांचं नुकसान झालं असून नव्या स्थानी घसरण झाली आहे. अफगाणिस्तानचा संघ २२० गुणांसह १० व्या स्थानी आहे.
संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच USA क्रिकेट संघानं सहा गुण मिळवून १३ व्या स्थानी झेप घेतली आहे. तर इटलीने जबरदस्त कामगिरी नोंदवून आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी ११ गुणांच्या कमाईसह २६ व्या स्थानावरून थेट २३ व्या स्थानी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आयसीसीच्या टी २० वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात नेपाळला १० विकेट्सने पराभूत केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.