IPL 2026: पडलेला चेहरा, पाणावलेले डोळे...! ६ पराभवानंतर प्रीती झिंटा अय्यरमध्ये गंभीर चर्चा, डगआऊटमध्ये पाँटिंगही अस्वस्थ

Preity Zinta discussion with Shreyas Iyer after loss: आरसीबीने पंजाब किंग्सचा २३ धावांनी पराभव करत आयपीएल २०२६ प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पराभवानंतर प्रीती झिंटा आणि श्रेयस अय्यर गंभीर चर्चेत दिसले, तर पंजाबचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे.
Preity Zinta discussion with Shreyas Iyer after loss
Preity Zinta discussion with Shreyas Iyer after losssaam tv
Published On

रविवारी आयपीएलमध्ये हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सला २३ रन्सने पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर प्लेऑफ गाठणारी पहिली टीम ठरलीये. या सिझनमधील १३ व्या सामन्यातील हा आरसीबीचा नववा विजय असून टीम सध्या १८ पॉईंट्सह टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. दरम्यान या पराभवानंतर पंजाब किंग्सच्या डगआऊटमधील वातावरण फारच गंभीर दिसून आलं.

प्रिटी झिंटाची श्रेयर अय्यरशी चर्चा

टीमच्या सलग सहाव्या पराभवानंतर पंजाब किंग्सची सह-मालक प्रीती झिंटा मैदानावर श्रेयस अय्यरशी बोलताना दिसली. टीमच्या सध्याच्या परिस्थितीमुळे झिंटा आणि अय्यर दोघंही खूप चिंतेत दिसून आले. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याचीही मनस्थिती काहीशी तशीच होती. पाँटिंग डगआऊटमध्ये शांतपणे एकटा बसलेला दिसला.

Preity Zinta discussion with Shreyas Iyer after loss
Ederson: भयंकर! गेल्या ८ वर्षांपासून एकच अंडरवेअर घालून खेळतोय फुटबॉल स्टार; कारण ऐकून धक्का बसेल

धर्मशालामध्ये पंजाब आणि आरसीबी यांच्यातील सामना संपताच प्रीती मैदानावर पोहोचली. तिने श्रेयसची भेट घेतली आणि त्याच्याशी बोलू लागली. यावेळी ती पंजाबच्या कर्णधाराला काहीतरी विचारताना दिसली. यावेळी श्रेयस अय्यरनेही तिला प्रतिसाद दिला. त्यांच्याकडे पाहता टीमच्या कामगिरीवर चर्चा सुरू असल्याचा अंदाज लावण्यात आला.

आरसीबीविरूद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सला विजयासाठी २२३ रन्सची गरज होती. यावेळी पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या सुरुवातीलाच टीमने प्रियांश आर्य (०), प्रभसिमरन सिंग (२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (१) यांच्या विकेट्स गमावल्या. हे तिन्ही फलंदाज १९ रन्सवर तंबूत परतले होते. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शशांक सिंगने २७ चेंडूंमध्ये ५६ रन्स करून टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण केवळ त्याचे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत.

Preity Zinta discussion with Shreyas Iyer after loss
Virat Kohli: विराट कोहलीचा आयपीएलमध्ये विक्रमांचा सिलसिला सुरूच; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

पंजाब २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून केवळ १९९ रन्स करू शकली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने ४ ओव्हरमध्ये ३८ रन्स देऊन २ विकेट्स घेतले. तर रसिक सलाम दारने ४ ओव्हरमध्ये ३६ रन्स देऊन ३ विकेट घेतले. जोश हेझलवूड, सुयश शर्मा आणि रोमॅरिओ शेफर्ड यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

Preity Zinta discussion with Shreyas Iyer after loss
DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

पंजाबसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण

पंजाबने आपल्या १३ व्या सामन्यात सहावा सामना गमावला. या सिझनमध्ये पंजाबने सलग सहा सामने जिंकले होते आणि त्यानंतर आता सलग सहाव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबकडे आता १३ सामन्यांमधून १३ पॉईंट्स आहेत. टीम सध्या चौथ्या स्थानावर आहे. परंतु त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com