

आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांचा वर्षाव दररोज पाहायला मिळतो आहे. आता सुरू असलेल्या आयपीएलमध्येही २०० पेक्षा जास्त रन्स करणं ही एक सहज बाब बनली आहे. यामुळे संपूर्ण सामन्यात फलंदाजांचं वर्चस्व दिसून येतं. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा यांनी बीसीसीआयसमोर काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल सुचवले आहेत.
आकाश चोप्रा यांच्या मते, हे बदल लागू झाले तर आयपीएल अजून रोमांचक होणार आहे. तसेच सामन्यांमधील थरार आणखी वाढण्याची शक्यता आहे. आकाश चोप्रांनी एकूण तीन खास नियम सुचवले आहेत. हे नियम कोणते आहेत ते पाहूयात.
पहिला नियम गोलंदाजांसाठी फार महत्त्वाचा आहे. सध्या टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही गोलंदाज जास्तीत जास्त चार ओव्हर टाकू शकतो. परंतु आकाश चोप्राने म्हटलं आहे की, एखाद्या गोलंदाजाने आपल्या चार ओव्हर्समध्ये तीन विकेट्स घेतल्या तर त्याला पाचवी ओव्हर टाकण्याची संधी मिळायला हवी. यामुळे चांगली गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि फलंदाजांवर अधिक दबाव निर्माण होईल.
दुसरा नियमातील बदल हा पॉईंट्सशी संबंधित आहे. आकाश चोप्रा यांच्या मते, फक्त सामना जिंकणं महत्त्वाचं नसून किती मोठ्या फरकाने विजय मिळवला हेही महत्त्वाचं ठरायला हवं. जर एखाद्या टीमने १५-१६ ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठलं किंवा ४० हून अधिक रन्सने विजय मिळवला तर त्या टीमला दोनऐवजी तीन गुण द्यायला हवेत. त्यामुळे टीम्समध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी अधिक स्पर्धा निर्माण होईल.
तिसरा आणि सर्वात चर्चेचा विषय ठरलेला बदल म्हणजे लांब सिक्सबाबत. चोप्रा यांनी सुचवलं आहे की, जर एखाद्या फलंदाजाने १०० मीटरपेक्षा मोठा षटकार मारला तर त्याला सहा नव्हे तर थेट आठ रन्स दिले पाहिजेत. हा प्रस्ताव यापूर्वी रोहित शर्माने मांडला होता. मात्र, हा नियम वादग्रस्त ठरू शकतो असं आकाश चोप्रांचं मत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.