

आयपीएल २०२६ च्या ६५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. कोलकाताने पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला चार गडी राखून पराभूत केले. खराब फलंदाजीमुळे मुंबईवर अखेरच्या सामन्यातही पराभवाला सामोरे जाण्याची नाचक्की सहन करावी लागली. आयपीएलचा ६५ वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. यात केकेआरनं ४ विकेट राखत मुंबईला हरवलं. मुंबईने दिलेल्या १४८ धावांचे आव्हान कोलकाताच्या संघाने १९ षटकात ६ विकेट गमावत पार केलं.
कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ विकेट गमावत १४७ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात केकेआरने १९ व्या षटकात ६ गडी गमावून १४८ धावांचे आव्हान पूर्ण केले. कोलकाताकडून मनीष पांडेने सर्वाधिक ४५ धावा केल्या. मुंबईवरील विजयामुळे कोलकाता पॉईट्स टेबलवरील ८ व्या स्थानावरून ६ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्याकडे १३ सामन्यांतून १३ पॉईट्स मिळाले आहेत.
दरम्यान या विजयामुळे केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. केकेआरच्या फलंदाजीची सुरुवातही चांगली झाली नाही. १० धावांवर असताना, ५ चेंडूंमध्ये ८ धावा करून फिन ॲलन बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने मनीष पांडेसोबत दुसऱ्या विकेटसाठी २८ चेंडूंमध्ये ३८ धावांची भागीदारी केली. दरम्यान, रोव्हमन पॉवेलने मनीष पांडेसोबत चौथ्या विकेटसाठी ४७ चेंडूंमध्ये ६४ धावा जोडून केकेआरचा विजय निश्चित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.