Virat Kohli injury: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्तान सिरीजपूर्वीच विराट कोहली बाहेर, काय आहे कारण?

India vs Afghanistan ODI: हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सिरीजमधून बाहेर पडला आहे. 2027 वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने ही सिरीज महत्त्वाची होती. त्याच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
India vs Afghanistan ODI
India vs Afghanistan ODIsaam tv
Published On

धर्मशालाच्या मैदानावर 13 जूनपासून सुरू होणाऱ्या भारत–अफगाणिस्तान वनडे सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहली या सिरीजमधून बाहेर पडला आहे. विराटला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून तो अफगाणिस्तानविरूद्धची वनडे सिरीज खेळणार नसण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या अहवालानुसार, विराट कोहलीला झालेल्या या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये खेळू शकणार नाही. ही सिरीज 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे विराटसारख्या अनुभवी खेळाडूची अनुपस्थिती ही टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब ठरू शकते.

India vs Afghanistan ODI
Axar Patel: अक्षर पटेलने केली मॅच फिक्सिंग? दिल्ली-पंजाब सामन्यात नेमकं झालं काय? वाचा

आयपीएल 2026 संपल्यानंतर विराट कोहली या सिरीजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची अपेक्षा होती. पण दुखापतीमुळे आता तो थेट न्यूझीलंडच्या दौऱ्यावर खेळण्याची शक्यता आहे. वयाच्या ३७ व्या वर्षीही फिटनेस आणि सातत्य यासाठी ओळखला जाणारा विराट सध्या आपल्या कारकिर्दीच्या उत्तम फॉर्ममध्ये असल्याचं मानलं जात होतं.

India vs Afghanistan ODI
Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या हायव्होल्टेज अंतिम सामन्यात विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध मॅच विनिंग अर्धशतकी खेळी खेळली. त्याच खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. संपूर्ण सिझनमध्ये विराटने आरसीबीसाठी शानदार कामगिरी करत 16 डावांमध्ये 56.25 च्या सरासरीने आणि 165.84 च्या स्ट्राईक रेटने एकूण 675 रन्स केले होते.

India vs Afghanistan ODI
T20 Mumbai League: सुपर ओव्हरचा थरार! सुवेद पारकरचं शतक व्यर्थ; अजिंक्य रहाणेच्या पँथर्सने जिंकला हाय-व्होल्टेज सामना

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या सिरीजसाठी उपलब्ध नसणार आहे. 13 जूनपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांची सिरीज वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com