T20 Mumbai League: सुपर ओव्हरचा थरार! सुवेद पारकरचं शतक व्यर्थ; अजिंक्य रहाणेच्या पँथर्सने जिंकला हाय-व्होल्टेज सामना

नुवामा प्रायव्हेट टी-20 मुंबई लीग 2026 मध्ये नॉर्थ मुंबई पँथर्सने बांद्रा ब्लास्टर्सवर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला. सुवेद पारकरच्या विक्रमी शतकानंतरही ब्लास्टर्सला पराभव स्वीकारावा लागला, तर पँथर्सने सलग दुसरा विजय नोंदवला.
T20 Mumbai League
T20 Mumbai Leaguesaam tv
Published On

नुवामा प्रायव्हेट टी-20 मुंबई लीग 2026 स्पर्धेत बुधवारी वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या हाय-स्कोअरिंग सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नॉर्थ मुंबई पँथर्सने बांद्रा ब्लास्टर्सवर सुपर ओव्हरमध्ये मात करत सलग दुसरा विजय नोंदवला. कर्णधार सुवेद पारकरच्या विक्रमी शतकानंतरही बांद्रा ब्लास्टर्सला पराभवाचा सामना करावा लागला.

फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना बांद्रा ब्लास्टर्सने 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 228 रन्सचा डोंगर उभा केला. या डावात कर्णधार सुवेद पारकरने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलंय. त्याने अवघ्या 46 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत 54 चेंडूंमध्ये 110 रन्सची खेळी केली. त्याच्या खेळीत 10 फोर आणि 7 षटकारांचा समावेश होता.

T20 Mumbai League
हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

ब्लास्टर्सची सुरुवातही दमदार झाल्याचं पाहायला मिळालं. पारकर आणि प्रतीककुमार रविशंकर यांनी ओपनिंगच्या विकेटसाठी केवळ आठ ओव्हर्समध्ये 101 रन्सची पार्टनरशिप केली. रविशंकरने 15 चेंडूंमध्ये 33 रन्स केले. त्यानंतर पारकरने पराग खानापूरकरसोबत 67 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. खानापूरकरने 15 चेंडूंमध्ये 22 रन्स केले.

पारकर बाद झाल्यानंतर जय जैन आणि ध्रुमिल मटकर यांनी आक्रमक फलंदाजी करत टीमचं रनरेट कायम ठेवलं. दोघांनी 52 रन्सची पार्टनरशिप केली. मटकरने सलग तीन सिक्स लगावत टीमला 200 रन्सचा टप्पा पार करून दिला. जय जैन 28 रन्सवर नाबाद राहिला तर मटकरनेही 28 रन्सचं योगदान दिलं.

229 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नॉर्थ मुंबई पँथर्ससाठी हार्दिक तामोरने पुन्हा एकदा स्फोटक खेळी केली. त्याने अवघ्या 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत 39 चेंडूंमध्ये 83 रन्स फटकावले. त्याला कर्णधार अजिंक्य रहाणे (15) आणि अभिज्ञान कुंडू (39) यांची चांगली साथ मिळाली.

T20 Mumbai League
IND vs NZ series 2026: 40 दिवस आणि 12 सामने; पाहा कसा असणार टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा

मात्र, लेगस्पिनर सागर छाब्रियाने तामोर, आयुष वर्तक आणि आयुष झिमारे यांना झटपट बाद करत सामन्याचं पारडं काही काळासाठी ब्लास्टर्सच्या बाजूने झुकवलं. तरीही तनुष कोटियनने हार मानली नाही. त्याने 14 चेंडूंमध्ये 32 रन्सची झंझावाती खेळी करत टीमला 228 रन्सपर्यंच पोहोचवलं. त्याच्या खेळीत दोन फोर आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

T20 Mumbai League
DC vs CSK : संजू सॅमसनची वादळी फलंदाजी; चेन्नई सुपर किंग्सचा दिल्लीविरोधात ऐतिहासिक विजय

सुपर ओव्हरमध्ये नॉर्थ मुंबई पँथर्सने प्रथम फलंदाजी करत 1 बाद 20 रन्स केले. वैभव माळीने दोन सिक्स आणि एक चौकार लगावत टीमला मोठी धावसंख्या उभारून दिली. प्रत्युत्तरात बांद्रा ब्लास्टर्सला केवळ 7 रन्स करता आले आणि पँथर्सने थरारक विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com