SRH vs GT Match Weather: हैदराबाद - गुजरात सामना रद्द होणार! समोर आली मोठी अपडेट

IPL 2024, SRH vs GT Match Weather Update: आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
SRH vs GT, IPL 2024: हैदराबाद - गुजरात सामना रद्द होणार! समोर आली मोठी अपडेट
IPL 2024, Sunrisers Hyderabad VS Gujrat Titans Match May Get Cancel Due To Heavy Rain Predicted In Hyderabad Know SRH Vs GT Latest Weather Updatetwitter

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज गुजरात टायटन्सचा संघ लखनऊ सुपर जायंट्स संघाला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. आता हैदराबादविरुद्ध होणारा सामनाही रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

SRH vs GT, IPL 2024: हैदराबाद - गुजरात सामना रद्द होणार! समोर आली मोठी अपडेट
IPL 2024 Playoff Prediction: ४ संघ ५ सामने! RCB की CSK? कोण जाणार प्लेऑफमध्ये?

सनरायझर्स हैदराबादचे या हंगामातील २ सामने शिल्लक आहेत. सध्या १४ गुणांसह हा संघ चौथ्या स्थानी आहे. १८ गुणांपर्यंत पोहचायचं असेल तर हैदराबाद कुठल्याही परिस्थितीत दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र आज होणारा सामना रद्द होऊ शकतो. असे झाल्यास गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रत्येकी १-१ गुण दिला आहे.

हा सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र हैदराबादमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. संपूर्ण स्टेडियम कव्हर्सने झाकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ही सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फॅन्ससाठी अत्यंत वाईट बातमी आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड (Head To Head Record)

आज होणारा सामना हा सनरायझर्स हैदराबादच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. याचा थोडाफार फायदा हैदराबादला नक्कीच होऊ शकतो. दोकुई संघांचा एकूण रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ३ सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने बाजी मारली आहे. तर सनरायझर्स हैदराबादला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

SRH vs GT, IPL 2024: हैदराबाद - गुजरात सामना रद्द होणार! समोर आली मोठी अपडेट
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com