SRH vs GT: हैदराबाद - गुजरात सामन्यात कोण पाडणार धावांचा पाऊस? या ४ खेळाडूंवर असतील साऱ्यांच्या नजरा

SRH vs GT, Top Players To Watch Out: आयपीएल स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा संघ गुजरात टायटन्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.
Top players to watch out in sunrisers Hyderabad vs Gujarat Titans match SRH vs GT IPL 2024 amd2000
Top players to watch out in sunrisers Hyderabad vs Gujarat Titans match SRH vs GT IPL 2024 amd2000google

आयपीएल स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा संघ गुजरात टायटन्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर हैदराबादला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. गुजरातचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्यांना या सामन्याच्या निकालाचा फारसा फरक पडणार नाही. मात्र ते हैदराबादचा प्लान फ्लॉप करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. दरम्यान या सामन्यात कोणते ४ फलंदाज धावांचा पाऊस पाडू शकतात? जाणून घ्या.

ट्रेविस हेड -

ट्रेविस हेड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये ५३३ धावा केल्या आहेत. दरम्यान या सामन्यातही तो मोठी खेळी करू शकतो.

साई सुदर्शन -

गुजरातचा संघ जर चांगली कामगिरी करत नसला तरीदेखील साई सुदर्शनने आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये ५२७ धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात त्याने शतक झळकावलं होतं. या सामन्यातही तो मोठी खेळी करू शकतो.

Top players to watch out in sunrisers Hyderabad vs Gujarat Titans match SRH vs GT IPL 2024 amd2000
IPL 2024 Playoff Prediction: ४ संघ ५ सामने! RCB की CSK? कोण जाणार प्लेऑफमध्ये?

अभिषेक शर्मा -

ट्रेवीस हेडसोबत मिळून अभिषेक शर्माने विरोधी संघातील गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये ४०१ धावा केल्या आहेत.

शुभमन गिल -

गुजरात टायटन्स संघाची जबाबदारी खांद्यावर असूनही शुभमन गिलने फलंदाजीत संघासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये ४२६ धावा केल्या आहेत. आज होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे

Top players to watch out in sunrisers Hyderabad vs Gujarat Titans match SRH vs GT IPL 2024 amd2000
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com