आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर उर्वरित २ स्थांनासाठी अजूनही ५ संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. या ५ पैकी २ संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार आहे. ज्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांना प्रबळ दावेदार मानलं जात आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ देखील रांगेत आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ या स्पर्धेत टिकून असला तरीदेखील या संघांचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग सोपा नसणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत १४ सामने खेळले आहेत. या संघाचे १४ गुण असून नेट रनरेट -०.३७७ इतका आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स संघाचे १२ गुण आहेत. या संघाला अजूनही १ सामना खेळायचा आहे. त्यामुळे हा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात चुरशीची लढत सुरू आहे. हे दोन्ही संघ आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत.
हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना १८ षटकात जिंकावा लागेल किंवा गोलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघावर १८ धावांनी विजय मिळवावा लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जर या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा चान्स वाढेल. यासह दिल्ली आणि लखनऊचा चान्स देखील वाढणार आहे. सनरायझर्स हैदराबादला अजूनही २ सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने जिंकून हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.