IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

IPL 2024, RCB Playoffs Scenario: लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा मार्ग आणखी सोपा झाला आहे.
IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं
RCB Can still qualify in ipl 2024 playoffs know the scenario after delhi capitals beat lucknow super giants amd2000saam tv news
Published On

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर लखनऊने दिल्लीचा १९ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात विजय दिल्लीचा झाला. मात्र दिल्लीचे खेळाडू नाराज असल्याची दिसून आले.

तर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. राजस्थानचा प्लेऑफमध्ये प्रवेश झाला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्लेऑफचा मार्ग आणखी सोपा झाला आहे.

लखनऊच्या पराभवाचा आणि दिल्लीच्या विजयाचा सर्वात मोठा फायदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला झाला आहे. हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा चान्स देखील वाढला आहे.

आता प्लेऑफच्या शर्यतीत असलेले चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. एकदा १४ गुण झाले की, ज्याचा नेट रनरेट चांगला असेल तो संघ चौथे स्थान मिळवेल. सध्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडे १६ गुणांपर्यंत जाण्याची संधी आहे. इथून पुढे चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणारा सामना देखील निर्णायक सामना असणार आहे

IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं
RCB vs CSK, IPL 2024: बंगळुरुच्या फॅन्ससाठी चिंता वाढवणारी बातमी! RCB vs CSK सामना रद्द होण्याची शक्यता; वाचा कारण

आतापर्यंत या संघांनी केलाय प्रवेश

प्लेऑफमध्ये जाणाऱ्या संघांबद्दल बोलायचं झालं तर, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना कन्फर्म तिकीट मिळालं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर या संघाने १३ सामने खेळले आहेत. यापैकी ९ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे.

IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं
DC vs LSG, IPL 2024: लखनऊसाठी 'करो या मरो'ची लढत; दिल्लीविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड?

तर ३ सामने गमवावे लागले आहेत आणि १ सामना अनिर्णीत राहिला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने १२ सामने खेळले असून ८ सामने जिंकले आहेत. तर २ सामने गमावले आहेत. राजस्थानचा संघ गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स संघाला मागे सोडण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com