आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याचा चान्स आहे. मात्र गुजरातचा संघ हैदराबाद प्लान फ्लॉप करू शकतो. कारण गुजरातविरुद्ध खेळताना हैदराबादचा रेकॉर्ड तितका शानदार राहिलेला नाही.
हा सामना सनरायझर्स हैदराबादच्या होम ग्राऊंडवर होणार आहे. याचा थोडाफार फायदा हैदराबादला नक्कीच होऊ शकतो. मात्र एकूण रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ४ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान ३ सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने बाजी मारली आहे. तर सनरायझर्स हैदराबादला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.
हा सामना सनरायझर्स हैदराबादच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण या संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले असून ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह हा संघ चौथ्या स्थानी आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ १३ पैकी ५ सामने जिंकून ८ व्या स्थानी आहे.
सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र या संघाचं लक्ष टॉप २ मध्ये प्रवेश करण्यावर असणार आहे. या संघाचा नेट रन रेट +०.४०६ इतका आहे. जो इतर संघांच्या तुलनेत चांगला आहे. या संघाला अजूनही २ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे हा संघ जास्तीत जास्त १८ गुणांची कमाई करून दुसऱ्या स्थानी पोहचू शकतो.
तर गुजरातचा संघ आपल्या शेवटच्या सामन्यात विजयी सलामी देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेला सामना गुजरात टायटन्स संघासाठी प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. मात्र हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे गुजरातचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.