
IPL 2025 च्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर जो संघ रनचेज करतो, तो संघ विजयी होतो अशी आकडेवारी आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकलेले नाही. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज आयपीएलचा नवा चॅम्पियन मिळणार आहे. आता बंगळुरू आणि पंजाब या फायनल सामन्यातील लढतीत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ -
विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), मयंक अगरवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड,
इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, रसिख डार, मनोज भांडगे, टिम सायफर्ट, स्वप्नील सिंह
पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंह, अझमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेयर पर्याय : हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंह, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, प्रवीण दुबे
दोन्ही संघांमध्ये फारसे बदल झालेले नाही. पंजाब किंग्स ज्या प्लेईंग ११ सोबत क्वालिफायर २ सामन्यात खेळले होते, तेच ११ शिलेदार आजही खेळणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये टीम डेव्हिडच्या जागी मयंक अग्रवालला खेळवले जाणार आहे. फिल सॉल्ट भारतात परतल्याने बंगळुरूची चिंता मिटली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.