
आयपीएल २०२५ सीझनमधील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता. मात्र भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे आयपीएलचे सामने १० दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते. पुढे शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर सामने पुन्हा सुरू झाले. यंदाच्या हंगामात RCB आणि PBKS या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. आजच्या अंतिम सामन्यात टॉस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. टॉस जिंकून गोलंदाजी करणारा संघ विजयी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या सामन्यात टॉस खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही संघ टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील. कारण या मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजयाचा टक्का अधिक आहे. शिवाय पिच फलंदाजांना मदत करणारी असल्यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग शक्य आहे.
या वर्षी आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार आहे. RCB आणि PBKS या दोघांनीही अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे रजत पाटीदार किंवा श्रेयस अय्यर यांच्यासमोर इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. रॉयल चॅलेंजर्स संघ चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. याआधी २०१६ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. पण सनरायझर्स हैदराबादने त्यांना पराभूत केले होते. दुसरीकडे, पंजाब किंग्स २०१४ मध्ये एकदाच फायनलमध्ये पोहोचला होता. दोन्ही संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
यंदाचा समारोप सोहळा खास असणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. समारोप सोहळा सायंकाळी ६ वाजता सुरू होईल हा समारोप सोहळा सामन्याच्या वेळेत कोणताही बदल करणार नाही. सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर टॉस सायंकाळी ७ वाजता होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.